पुनावळे, पुणे:३३ –
वरिष्ठ पत्रकार तथा साहित्यिक बाबू डिसोजा कुमठेकर यांच्या घरी गेली ३५ वर्षे भक्तिभावाने श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. दरवर्षी एक संकल्पना घेऊन गणेशोत्सवासाठी सजावट, आरास केली जाते. यावर्षी देखील इको फ्रेंडली सजावट करताना पानांच्या पत्रावळी घेऊन त्यावर हस्तलिखित आध्यात्मिक सुचिन्हे रेखाटून सुरेख अशी आरास करून इको फ्रेंडली गणेशोत्सवाची संकल्पना राबवली आहे.
या गणेशोत्सवात त्या़ंची दोन्ही मुले, सुना, नातवंडे उत्साहाने, भक्तीभावाने श्रीगणेशाची पूजा पारंपरिक पद्धतीने करतात. बाबू डिसोजा कुमठेकर यांच्या घरी पाच दिवसांचा सोहळा मोठ्या आनंदाने साजरा होतो.
