पिंपरी – दिनांक १५ सप्टेंबर रोजी पवनेचा प्रवाह साप्ताहिकाचे संपादक शिवाजीराव शिर्के यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी आकस्मिक निधन झाले.
त्यांना गुणवंत कामगार पुरस्कार मिळाला होता.ते पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष होते. फुगेवाडी जेष्ठ नागरिक संघाचे त्यांनी अध्यक्ष पद भूषविले होते. शिर्के घराण्याचा इतिहास सांगणारे संशोधनपर पुस्तक प्रकाशित केले होते.सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमास ते नेहमीच उपस्थित रहात.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,सून, नातवंडे,दोन मुली असा शोकाकुल परिवार आहे.
आमच्या तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
वरीष्ठ पत्रकार बाबू डिसोजा यांनी वृत्त आढावा घेतला आहे.
