प्राधिकरण निगडी –
प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ व मधुमेह रुग्ण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने “डॉक्टर्स डे” ०१/०७, बुधवारी सायंकाळी पाच वाजता संत तुकाराम उद्यानात साजरा झाला.
दीप प्रज्वलनानंतर,श्रीमती अलका कणखर यांनी स्वागत गीत सादर केले.प्रमुख पाहुणे डॉ.अनिरुद्ध टोणगावकर होते.त्यांच्या सत्कारानंतर मधुमेह रुग्ण संघटनेचे अध्यक्ष डॉ.दिगंबर इंगोले यांनी प्रास्ताविक केले.तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.दोघांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. डॉ.टोणगावकर यांचा परिचय सौ.आशा नष्टे यांनी करून दिला.डॉ.टोणगावकर यांनी ज्येष्ठ नागरिकांना होणारे विविध आजार त्याची कारणे आणि त्यावरील प्रभावी उपाययोजना याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे , डॉ चंद्रकांत वाळके,डॉ दिलीप सोनवणे,डॉ विकास मंडलेचा, यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ नागरिक संघातील डॉ.गुणवंत चिखलीकर, डॉ.दिगंबर इंगोले,डॉ.अरविंद वाघचौरे, डॉ.दामोदर बराटे. डॉ. रजनी जैन,डॉ.माऊली फरांदे, डॉ.प्रमिला उन्नरकर यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला नगरसेविका सौ. शैलजाताई मोरे, माजी नगरसेविका भारती फरांदे तसेच संघाचे सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,सौ शुभदा मेंगळे यांनी केले.आभार श्री नरेंद्र मिसाळ यांनी मानले. संघाच्या प्रार्थनेनंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
