You are currently viewing क्रांतिविरांगना हौसाताई पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कविसंमेलनाचे आयोजन

क्रांतिविरांगना हौसाताई पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कविसंमेलनाचे आयोजन

विटे (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :

क्रांतिविरागना हौसाताई पाटील यांचा पाचवा स्मृतिदिन दिनांक 23 सप्टेंबर 2026 रोजी आहे. त्यांचे स्मृतिदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. गेली पाच वर्षे हा आगळावेगळा उपक्रम चालू आहे. ही माहिती सुभाष पाटील यांनी दिली.

यासाठी त्याच्यावर प्रेम असणारे प्रख्यात साहित्यिक आणि विडंबनकार श्री प्रभाकर साळेगावकर, अहमदपूर चे माय मराठी व्रुत्तवाहिनीचे निर्माते संपादक जेष्ठ कवि राजेसाहेब कदम हे आपल्या एक दोन साहित्यिक मित्रांना घेऊन उपस्थित राहतात. या दोघांचे बरोबरच आपल्या परिसरातील साहित्यिक कवि रघुराज मेटकरी, प्रा विश्वनाथ गायकवाड, सुभाष कवडे, सुधीर इनामदार, सुनील दबडे, एम. डी. जमादार, अशोक पवार, कवयित्री वृषाली कुलकर्णी, यांच्यासह अनेक मान्यवर कवि साहित्यिक या अभिवादन कवि संमेलनात सहभागी होणार आहेत. दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता विटा येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठ येथे हे कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा