You are currently viewing डॉक्टर संजय ओक व सहकाऱ्यांच्या हस्ते 22 लहान मुलांवर मोफत शस्त्रक्रिया..

डॉक्टर संजय ओक व सहकाऱ्यांच्या हस्ते 22 लहान मुलांवर मोफत शस्त्रक्रिया..

बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था, सुशिला गणेश निगुडकर ट्रस्ट आणि रोटरी क्लब कुडाळ यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित केलेले बालरुग्ण शस्त्रक्रिया शिबिर डॉ संजय निगुडकर यांच्या श्री गणेश हॉस्पिटल येथे काल आणि आज यशस्वीपणे पार पडले. या शिबिरात २२ बालकांवर विनामूल्य तत्वावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. डॉ संजय ओक (बाळरुग्ण शल्यचिकित्सक आणि महाराष्ट्र कोविड-१९ टास्क फोर्स प्रमुख), डॉ पारस कोठारी (प्राध्यापक, बालरुग्ण शस्त्रक्रिया विभाग, लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय आणि सायन हॉस्पिटल), डॉ अभय गुप्ता (प्राध्यापक, बालरुग्ण शस्त्रक्रिया विभाग, लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय आणि सायन हॉस्पिटल), डॉ मनीष कोटवानी (सहयोगी प्राध्यापक आणि भूलतज्ज्ञ, लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय आणि सायन हॉस्पिटल), डॉ वादिराज सौदत्ती (ज्येष्ठ भूलतज्ज्ञ, सिंधुदुर्ग) यांनी ह्या शिबिरात भाग घेतला. त्याचप्रमाणे ३५ बालकांना बाह्यरुग्ण तत्वावर तपासण्यात आले ज्यापेईकी १७ बालकांवर सायन हॉस्पिटल येथे विनामूल्य तत्वावर तर ७ बालकांवर कौशल्य हॉस्पिटल,ठाणे येथे माफक दरात शस्त्रक्रिया होणार आहेत. आपण सर्वांनी दिलेल्या आर्थिक सहकार्याबद्दल तसेच आपल्या शुभेच्छांबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. आपल्या ह्या कृतीने आज आपण २२ घरांमध्ये चिरकाल टिकणारा आनंद दिलेला आहे!

सोबत मुलांची नावे अणि छायाचित्र

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 5 =