You are currently viewing ओसरगावात डी-मार्ट प्रकल्पाच्या कामाला वेग; गणेशपूजनाने कामाची सुरुवात

ओसरगावात डी-मार्ट प्रकल्पाच्या कामाला वेग; गणेशपूजनाने कामाची सुरुवात

ओसरगावात डी-मार्ट प्रकल्पाच्या कामाला वेग; गणेशपूजनाने कामाची सुरुवात

तलाव व महामार्गालगत उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा

ओसरगाव : ओसरगाव तलाव व महामार्गालगत प्रस्तावित डी-मार्ट प्रकल्पाचे काम सध्या जोरदारपणे सुरू असून, कंपनीच्या वतीने आज गणेश प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच ग्रामदेवता श्री लिंग माऊलीचे गाऱ्हाणे करून प्रकल्पाचे काम सुरळीतपणे पूर्ण व्हावे, यासाठी प्रार्थना करण्यात आली.
या वेळी भविष्यात हा प्रकल्प भव्य-दिव्य स्वरूपात पूर्ण होऊन परिसराच्या विकासाला चालना मिळण्यासोबतच स्थानिक युवक-युवती व महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या कंपनीच्या भूमिकेबद्दल ग्रामस्थांकडून कंपनीचे आभार व्यक्त करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा