You are currently viewing गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांसाठी देवगड आगारातून ज्यादा बससेवा

गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांसाठी देवगड आगारातून ज्यादा बससेवा

गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांसाठी देवगड आगारातून ज्यादा बससेवा

१६ ते २७ सप्टेंबरदरम्यान मुंबई, बोरीवली, ठाणे, कुर्ला, नालासोपारा व चिंचवडसाठी विशेष फेऱ्यांचे नियोजन

देवगड :

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या देवगड आगारातर्फे चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी ज्यादा बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. १६ ते २५ सप्टेंबरदरम्यान देवगड-नालासोपारा बस दररोज दुपारी ३ वाजता सोडण्यात येणार आहे.

१९ सप्टेंबरला देवगड-बोरीवली तीन बस दुपारी ३.३०, ३.४५ व सायंकाळी ५ वाजता, देवगड-मुंबई दोन बस ४.१५ व ४.४५ वाजता, देवगड-कुर्ला नेहरूनगर एक बस ४.३० वाजता आणि देवगड-ठाणे एक बस ४.१५ वाजता सोडण्यात येणार आहे.
२० सप्टेंबरला देवगड-बोरीवलीसाठी दहा विशेष बस ३.३० ते ५.१५ या वेळेत, देवगड-मुंबई तीन बस ४.१५, ४.३० व ४.४५ वाजता, देवगड-कुर्ला नेहरूनगर दोन बस ४ व ४.३० वाजता, देवगड-ठाणे एक बस ४.१५ वाजता आणि देवगड-चिंचवड एक बस सायंकाळी ५ वाजता उपलब्ध राहणार आहे.

२१ सप्टेंबरला देवगड-बोरीवली चार बस ३.३०, ३.४५, ४ व ५ वाजता, देवगड-मुंबई दोन बस ४.१५ व ४.४५ वाजता आणि देवगड-कुर्ला नेहरूनगर एक बस ४.३० वाजता सोडण्यात येणार आहे.

तसेच २६ सप्टेंबरला देवगड-बोरीवली दोन बस सायंकाळी ४ व ५.१० वाजता, तर देवगड-मुंबई एक बस सायंकाळी ६ वाजता सोडण्यात येणार आहे. २७ सप्टेंबरला देवगड-बोरीवलीसाठी एक विशेष बस सायंकाळी ४.५५ वाजता उपलब्ध राहणार आहे.
गणेशोत्सवानिमित्त मुंबई व उपनगरातून देवगडमध्ये आलेल्या चाकरमान्यांना परतीच्या प्रवासासाठी या ज्यादा बससेवेचा लाभ घेता येणार आहे. गर्दीच्या काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आगाराने हे नियोजन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा