*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ढोलताशा ..! गणनायका..!*
चांदण वैभव घेवून..शरद
उंबरठ्यावर ..उभा राहतो
बाऊ करीत.. श्रावणाचं
आषाढ …अंगात येतो…..!
फुकून मंत्रचांदण ..शारदेचं
सृष्टीला प्रवचन.. देत बसत
रात्रीची वाट… बघत बघत
दिवसाला अबोला घेऊन राहत..!
सावळीत.. सावळी सावळी होत
श्रावणांत अष्टमी ..उगवते
बाळकृष्णाच्या लीलांनी हरखून
निळीशार मोरपंखी होत जाते ..!
ढोलताश्यांच्या गजरात
धून मुरलीची ..मागे पडते
श्री गणेशाच्या आगमनाने
गोपाळकाल्यास.. मोदक भरवते..!
चतुर्भुज दंड पाशाकुंशध्वज आगमन
कटि पितांबर गौरांगावर मूर्त तुझी
गणनायका ..अणुगर्भी तृणदर्भी दर्शन
शुभंकरा ..ज्योतिर्मय आभा तुझी..!
बाबा ठाकूर ठाकूरीउवाच
प्रार्थनाघर..सादरीकरणाची
