You are currently viewing बदलत चाललेला आजचा नवरात्र उत्सव

बदलत चाललेला आजचा नवरात्र उत्सव

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी राजा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*बदलत चाललेला आजचा नवरात्र उत्सव*

 

अनेक दिवसांपासून हा विषय माझे मनांत होता.आणि अनेकांना याच विषयी प्रबोधन करण्याचाही बराच प्रयत्न केला होता पण ?

अशा विशिष्ट विषयांसाठी *मान्यवर* जनांचा उल्लेख येतो तेव्हा त्या लिखाणाला *समाज मान्यता* मिळते किंवा निदान ते लिखाण वाचले तरी जाते.

 

ही अशीच एक पोस्ट आहे, धर्मावर बाजाराचे अतिक्रमण होत आहे आणि त्याचे परिणाम काय असतील ते सांगणारी.

 

——राजा जोशी

 

पोस्ट अशी आहे:

 

प्रसिध्द हिंदुत्ववादी लेखक तसेच भागवत व रामायणाचे अभ्यासक *डॉ.सच्चिदानंद शेवडे व गणकप्रवर सिध्दांति ज्योतिषरत्न डॉ. गौरव देशपांडे* या दोन मान्यवरांशी चर्चा करुनच आज हा विषय मांडत आहे.

 

परवा पासुन चार पाच महिलांनी दुरध्वनीद्वारे माझ्याशी संपर्क केला व एक विचारणा केली की “गुरुजी, नवरात्रात प्रत्येक दिवशी विविध रंगी साड्या नेसाव्यात  आणि देवीची व नवग्रहांची कृपा प्राप्त करुन घ्यावी असे मेसेज सोशल मिडिया द्वारे प्रसारीत होत आहेत. हे सत्य आहे का?”

 

(इथे एक सांगावेसे वाटते,हा फंडा *”महाराष्ट्र टाईम्स”* ह्या वर्तमानपत्राने *खतपाणी* घालून पोसला -राजा जोशी)

 

काही महिलांनी तर नऊ दिवस कोणत्या मँचिंग बांगड्या, कानातले – गऴ्यातले अलंकार हवेत व कोणते दागीने घालावेत व त्यांनी देवीची कशी कृपा होते याचेही मेसेज आपणास आले आहेत असे सांगीतले. धर्मशास्त्रात असे काही दिलय का? असे विचारले.

 

गरबा व दांडिया खेऴ हाच देवीला आवडतो व तो खेऴलात कि *”लक्ष्मी प्राप्त”* होईल अशाही चर्चा होताहेत. यात सत्यता आहे का? गुरुजी धर्मशास्त्रात हे दिलय का? असा प्रश्न आज मातृवर्ग विचारतोय.

 

मुंबई येथील सौ. सावंत नावाच्या महिलेने सांगीतले कि त्यांच्या ऑफीस मध्ये नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या व त्याला अनुसरुन मँचींग बांगड्या कानातले वगैरे अलंकार घालावेत असं ठरतेय.  “मी गरीब आहे. शिपाई पदावर काम करते. नवरा सतत आजारी असतो. मी एवढा खर्च करु शकत नाही तेव्हा मी काय करु ? देवीचा कोप होईल का माझ्या कुटुंबावर?”  हा प्रश्न ऐकुन मात्र मी हादरलोच व मनाशी ठाम ठरवले की यावर एक लेख द्यावाच.

 

*चार वेद, चार उपवेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे व उपपुराणे, भगवद्गीता, रामायण, महाभारत, दुर्गासप्तशती व दुर्गा उपासनेचे ग्रंथ,  जवऴपास साठ स्मृतिग्रंथ यांत कोठेही नवरात्रात नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या परीधान करा  अस दिलेले नाही.* धुतलेले स्वच्छ वस्त्र परीधान करा. सकच्छ म्हणजे नऊवारी साडी असेल तर उत्तम असे दिले आहे. जे तुमच्या जवऴ अलंकार असतील ते घाला. त्यांत मँचींग हवंच अस नाही.

 

*मार्केटिंग कंपन्यांनी* विविध कल्पना वापरुन हल्ली प्रत्येक क्षेत्रात पाय पसरण्यास आरंभ केलाय व त्यामुळे सणांचे पावित्र्य जाऊन त्यात बिभत्सपणा आलाय.

 

प्रत्येक प्रांताची एक विशेष संस्कृती असते ती जपली गेली पाहिजे.

 

महाराष्ट्रात *”घटस्थापना”* ही प्रधान असते .याच सोबत *अखंड नंदादिप, त्रिकाऴ पूजन, सप्तशती पाठ वाचन, सुवासिनी पूजन, कुमारीका पूजन व भोजन व माऴा बांधणे* इत्यादी पध्दतीने नवरात्र होते.

ललीता पंचमी, महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे), अष्टमीचे होम हवन, सरस्वती आवाहन पूजन असेही धार्मिक विधी महाराष्ट्र व गोवा प्रांतात असतात.

कर्नाटकात दसरा मोठा असतो.

*कच्छ – सौराष्ट्र – गुजराथ प्रांतात देवीची प्रतिमा पूजन* करुन रात्री जागरण, गरबा तसेच होम हवन वगैरे पध्दतीने हा उत्सव करतात.

*प.बंगाल* मध्येही हा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो.

बंगाल मध्ये मात्र गणपती उत्सवा प्रमाणे दुर्गादेवी मूर्ती पूजनासाठी घरी आणली जाते,कारण त्याच विक्री ठिकाणी ह्या मूर्ती विक्रीस ठेवतात.

त्या मूर्ती विसर्जन कशा करायच्या हे मात्र सोईस्करपणे विसरले जाते,नुकतेच झालेले श्री गणेश विसर्जन आणि आता हे देवी विसर्जन

 

*इव्हेंट मँनेजमेंट* कंपन्या यात बरीच गडबड करतात – सरमिसळ करतात व नवीनच पध्दत निर्माण करतात. ज्याला कोणताही पाया नसतो, शास्त्रीय आधार नसतो व त्यात देवीची उपासना हा सर्वात महत्त्वाचा व मुख्य भागच नसतो.

प्रत्येक प्रांताचे एक वैशिष्ट असते – परंपरा असतात, त्या जपल्याच  पाहिजे. अन्यथा काही वर्षांनी आपली मुले व नातवंडे नवरात्र याचा अर्थ डिजे लावून गरबा दांडिया खेऴणे एवढाच घेतील. *मातृशक्तीचा उत्सव* हा त्यांना कऴणारच नाही. मी हिंदू आहे म्हणजे माझे आचार, विचार, संस्कृती, माझ्या धार्मिक परंपरा याचा मला  एकदा विसर पडला की गळ्यात क्रॉस घाला किंवा सुंता करा काहीच फरक पडणार नाही. माझे धर्मांतर करणे अगदी सहज सोपे व सुलभ होणार. नेमकी हिच नस या इव्हेंट व मार्केटिंग कंपन्यांनी जाणली आहे. यात काहीहि झाले तरी लाभ परधर्मीयांचाच आहे.

 

एखाद्या गरीब भगिनीला हे *”हाय फाय” नवरात्र* जमणार नाही. ती देवी पूजन करणार नाही. म्हणजे हऴुहऴु ती नास्तिक होईल.

 

श्रीमंती, धर्मशिक्षणाचा अभाव व मौजमजा करायला मिळाल्याने तरुण पिढी या *”डिजे व गरबा दांडियाला”*  नवरात्र समजतील कारण यांनाही नवरात्र म्हणजे *देवी उपासना* हे माहितीच नाहीय.

थोडक्यात काय तर पराभव हा हिंदूंचाच होईल !

 

काही वर्षांपूर्वी *”डे “संस्कृती* भारतात नव्हती. जेव्हा  *”गिफ्ट वस्तुंच्या कंपन्या व ग्रिटिंग कार्ड कंपन्या “* आपल्या देशात आल्या तेव्हापासून हे “डे “च खूऴ डोक्यात शिरलय. *चॉकलेट डे,वेलेंटाईन डे, रोज डे* वगैरे. या दिवसांत करोडोंची उलाढाल या कंपन्या करताहेत. आज अशी अवस्था आहे कि मुलांना *गणपती, गोकुळाष्टमी* कधी आहे हे सांगाव लागते पण हे *”डे “* मात्र ते पक्के लक्षात ठेवतात.

*गोकुळाष्टमी* ही राजकीय पुढारी मंडळींच्या कृपेने अशीच *”डिजे व मद्यमय”* झाली आहे. किमान आईचा उत्सव असा होता कामा नये असे वाटतेय.

 

*चंड मुंड, शुंभ निशुंभ, रक्तबीज* वगैरे राक्षसांना मारुन त्यांचा उत्पात शमन करुन जगदंबेने जी  विश्रांती घेतली त्याचा काऴ हा नवरात्र आहे. या युध्दाचा शिण घालवण्याकरता देवीने नृत्य केले असा उल्लेख पुराणात आहे. (आपण युध्द करतच नाही – केवऴ नाचतो)

या काळात *महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती* या तिन्ही रुपांतील देवीची सेवा करणे. आपल्या परंपरेनुसार *नंदादिप, माऴ बांधणे* वगैरे आचार करावेत. मुलांकडुन सरस्वतीची उपासना ही विद्या व बुध्दि करता करुन घ्यावी. धनधान्य सुबत्तेकरता महालक्ष्मी उपासना करावी व शत्रू संहार सामर्थ्यप्राप्ती करता महाकालीची उपासना करावी.

 

मुलींनी दांडिया खेळण्याकडे अधिक लक्ष न देता विद्या मिऴवुन उत्तम मार्गाने धन जोडणे व छेडछाड करणार्या बदमाशांना चार फटके देण्याचे सामर्थ्य अंगी यावे या करता *देवीचे माहात्म्य व पराक्रम* वाचावेत तसेच ऐकावेत. आज काऴाची ही गरज आहे. हिरॉईनसारखे नाचण्यापेक्षा *महाकाली सारखा, झाशीच्या राणीसारखा, कित्तुरच्या चिन्नमा, जिजाबाईं* सारखा पराक्रम दाखवण्याची ही वेऴ आहे व आज गरज त्याचीच आहे. नाचणारे खूप झालेत पण पराक्रमी मात्र कमी होताहेत.

 

या दांडिया व गरब्याच्या काऴात *”संतति नियमनाच्या साधनांची”* विक्री दुप्पट होतेय व नंतर शालेय व कॉलेज तरुणींचॆ गर्भपात प्रमाणही वाढतेय. या बाबत काही सेवाभावी संस्थानी सर्व्हे करुन अहवाल सादर केलेत.

मुला मुलींना या धोक्यांची जाणीव करुन देणे हे कर्तव्य आपले आहे.

 

तेव्हा या *मार्केटिंग व इव्हेंट* फंड्यांना बऴी न पडता सात्विकपणे आनंदाने आपल्या परिस्थितीनुरुप *जगदंबेची सेवा* करा व देवीची कृपा प्राप्त करावी हि विनंती.

वरील माहितीत काही चुकीचे असेल तर क्षमस्व!

वेदभूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ले 9404170656

 

मूळ लेखकाचे नाव पत्ता कायम ठेवून ही पोस्ट मी एडिट केली आहे.कारण इतकेच की काही विशिष्ट गोष्टी अनावश्यक वाटल्या आणि काही ऍड करणे आवश्यक वाटले.

 

असेच,का? हा एक वेगळा विषय होईन.

*विनंती एकच गंभीरपणे ही पोस्ट वाचावी.👏🏼*

 

———राजा जोशी

9823687519

१३ ऑक्टोबर २०२६

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

प्रतिक्रिया व्यक्त करा