*गणेशोत्सवानिमित्त दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा उत्साहात संपन्न*
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल तसेच महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग व तळेरे ग्रामपंचायत यांच्या वतीने शनिवार दिनांक 12 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये तळेरे गावचे सरपंच माननीय हनुमंत तळेकर सर, साईकृपा संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सर, सहसचिव सुनील तांबे सर,कर्मचारी प्रणाली दळवी मॅडम,विशाखा कासले मॅडम, हर्षद खरात आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात हेलन केलर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.या मेळाव्यामध्ये उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सर यांनी घेण्यात आलेला दिव्यांग मेळावा का घेतला आहे? त्याचे महत्त्व पटवून दिले व थोडक्यात माहिती दिली.दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्नांवर चर्चा व त्यांना आवश्यक सहकार्य मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला विभाग वार मेळावा उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी साईकृपा संस्था अध्यक्ष श्री अनिल शिंगाडे सर यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले व विविध योजनांचे फायदे सांगितले.
या मेळाव्यामध्ये 30 हून जास्त दिव्यांग उपस्थित होते. उपस्थित दिव्यांग बांधवांना साईकृपा संस्थेच्या वतीने भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच तळेरे ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व दिव्यांग बांधवांची अल्पोपहाराची व्यवस्था केली.या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले तसेच समाजामध्ये आत्मविश्वासाने व स्वाभिमानाने जगण्याचा संदेश दिला. साईकृपा संस्थेचे सहसचिव सुनील तांबे सर यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.
