तासगाव (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) : तासगाव संस्थान, सांगली येथील दीड दिवसाचे गणपती विसर्जन व रथोत्सव दि. 15 सप्टेंबर 2026 रोजी तासगाव शहरात साजरा करण्यात येणार आहे. रथोत्सव पाहण्यासाठी जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातील मोठ्या संख्येने नागरिक, महिला व लहान मुले तासगाव शहरात येत असतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता तसेच गर्दीत कोणतेही वाहन घुसून जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या कलम 34 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये दि. 15 सप्टेंबर 2026 रोजी 00.01 वाजल्यापासून 24.00 वाजेपर्यंत काही मार्गांवरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जारी केले आहेत.
पोलीस वाहने, रुग्णवाहिका व अग्निशमन दलाची वाहने वगळता इतर सर्व वाहनांसाठी पुढीलप्रमाणे पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. सांगली-मणेराजुरीकडून येणारी वाहतूक (विटा/आटपाडीकडे जाणारी वाहने) :- कॉलेज कॉर्नर तासगाव – भिलवडी नाका – एसटी स्टॅण्ड – विटा नाका – विटा.
कॉलेज कॉनर्र तासगाव – भिलवडी नाका – एस.टी. स्टॅण्ड – विटा नाका – आटपाडी.
विट्याकडून तासगावकडे येणारी वाहतूक (सांगलीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी) :-विटा नाका – चिंचणी नाका – चिंचणी चौक – थळेश्वर मंदिर चिंचणी – मणेराजुरी हायवे – कॉलेज कॉर्नर, तासगाव – सांगली.
आटपाडीकडून तासगावकडे येणारी वाहतूक (सांगलीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी) :- आटपाडी – पुणदी फाटा – वाघमोडे वस्ती चिंचणी – चिंचणी चौक – थळेश्वर मंदिर चिंचणी – मणेराजुरी हायवे – कॉलेज कॉर्नर, तासगाव – सांगली. आटपाडीकडून तासगावकडे येणारी वाहतूक (भिलवडीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी) : आटपाडी – पुणदी फाटा – वाघमोडे वस्ती चिंचणी – चिंचणी चौक – थळेश्वर मंदिर चिंचणी – मणेराजुरी हायवे – कॉलेज कॉर्नर, तासगाव – भिलवडी.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्पष्ट केले आहे.
