*तालुका स्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलचे सुयश*
वेंगुर्ले
क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी आयोजित तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा दिनांक 8 सप्टेंबर रोजी सिद्धिविनायक मंगल कार्यालय, वेंगुर्ला या ठिकाणी पार पडली.यामध्ये सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल,वेंगुर्ला या शाळेतील इयत्ता आठवीतील विद्यार्थी दूर्वांक निनाद मलबारी सातार्डेकर याने 14 वर्षांखालील मुले या गटातून प्रथम क्रमांक पटकावला तर 14 वर्षांखालील मुली या गटातून इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी शुभ्रा संदेश राऊळ हिने चतुर्थ क्रमांक पटकावला. या दोन्हीही विद्यार्थ्यांची कणकवली येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख,सचिव दत्तात्रय परुळेकर,संचालक प्रशांत नेरुरकर, शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा डिसोजा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे व त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
