*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*घर कधीच ..परकं होत नाही !!*
कांही घरं.. कशीबशी
श्वास घेतांना दिसतांत
चेहऱ्यावरचा रमलेला भूतकाळ
पुन्हा पुन्हा वाचत बसतांत ..!
घराच्या हरएक कोपऱ्यात
पोटच्या गोळ्यांना ..शोधतांत
उगवत्या सुर्याला रोजचं उगवतांना
पुन्हा पुन्हा मावळतांना बघतांत ..!
घर असूनही ते
घर ..राहत नाही
ते घर.. पोरक होतं
पण.. परकं होत नाही ..!
घराने अल्बम मध्ये
आठवणींचे फोटो जपले असतांत
पण त्याच्या काॅपीज काढायला
घरापाशी ..निगेटीव्ह नसतांत ..!
पोटची पोरं …परकी होतात
घर कधीच ..परकं होत नाही
आठवणींना कितीही कवटाळून बसलांत
घर त्या पोरांना…कधीच आपले
म्हणतं नाही ..!तुम्ही माफ करालही
घर माफ करणार नाही
घरचे पाळीव माणसही माफ करणार नाही..दारा बाहेरचा ईश्वरही नाही
यात कोणालाचं माफी नाही..
बाबा ठाकूर
