You are currently viewing बेळगाव मधील सौंदर्य स्पर्धेत गोव्याची ऋषाली सामंत विजयी.

बेळगाव मधील सौंदर्य स्पर्धेत गोव्याची ऋषाली सामंत विजयी.

‘श्रीकी’ क्रिएशन तर्फे विवाहित महिलांसाठी आयोजित मिसेस युनिटी ऑफ इंडिया (क्लासिक विभाग) 2021 या सौंदर्य स्पर्धेत म्हापसा गोवा येथील ऋषाली ऋषिकेश सामंत हिने विजेतेपद प्राप्त केले आहे. बेळगाव येथे हॉटेल ऐफा येथे या स्पर्धेची भव्य अंतिम फेरी पार पडली व ऋषाली सामंत यांना ‘युनिटी क्वीन ऑफ इंडिया’ (क्लासिक विभाग) 2021 विजेती म्हणून घोषित करण्यात आले. या स्पर्धेत बेळगाव येथील डॉ. शोभा या प्रथम उपविजेत्या तर बेंगलोर येथील शिवानी हर्डीकर या द्वितीय उपविजेत्या ठरल्या. या स्पर्धेत विजयी ठरल्याने ऋषाली सामंत हिला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे. ऋषाली सामंत या व्यवसायाने मेकअप आर्टिस्ट असून गेली वीस वर्षे त्या या व्यवसायात असून, सौंदर्य तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांना या क्षेत्रातील अनेक पुरस्कार आजपर्यंत प्राप्त झाले असून, सौंदर्य विषयक विविध उपक्रमात सहभाग घेऊन त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली उपस्थिती नोंदवली आहे.

अंतिम स्पर्धेसाठी अनेक फे-यांचे आयोजन करण्यात आले होते. भारताची परंपरा आणि संस्कृती यावर स्पर्धकांनी सादर केलेले फोटोशूट व व्हिडिओ तसेच प्रत्यक्ष स्पर्धेवेळी स्पर्धकांनी सादर केलेले सादरीकरण व बौद्धीक चुणूक व्यक्त करणारी प्रश्नोत्तरे या माध्यमातून स्पर्धेची विजेती निश्चित करण्यात आली. गोव्या बरोबरच कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार, ओरिसा, झारखंड येथील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते.

ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आयुष्यमान हेल्पिंग फाऊंडेशनच्या रुपाली होसकोटी, एस. एल. व्ही. ग्रुपचे व्यवस्थापक विनोद दाभाळे व आयकॉनिक प्रॉडक्शनचे आंतरराष्ट्रीय सहयोगी लेडर वॉरेन आणि सौरभ वाकल यांचे विशेष सहाय्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 4 =