You are currently viewing सिंधुदुर्गातही आजपासून मनसेचे सदस्य नोंदणी अभियान सुरू…

सिंधुदुर्गातही आजपासून मनसेचे सदस्य नोंदणी अभियान सुरू…

सरचिटणीस परशुराम उपरकर यांची माहिती

कणकवली

मनसेच्या 15 व्या वर्धापनदिन जनतेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घराघरात उत्साहात साजरा केला. मनसे वर्धापनदिनानिमित्त 14 मार्चपासून मनसे सदस्य नोंदणी मोहीम राज्यात सुरू झाली आहे. सिंधुदुर्गातही आजपासून मनसेचे सदस्य नोंदणी अभियान सुरू केले असल्याची माहिती मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली.

सिंधुदुर्गात स्वतः परशुराम उपरकर, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, वैभववाडी तालुकाध्यक्ष सचिन तावडे, देवगड तालुकाध्यक्ष चंदन मेस्त्री, अमित इब्रामपूरकर, प्रसाद गावडे, दिपक पार्टे, राजेश टांगसळी, संतोष कुडाळकर, जितेंद्र काळसेकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी स्वतःची ऑनलाइन नोंदणी केली.

सिंधुदुर्गातील युवा वर्ग, तसेच तरुणी आणि जेष्ठांना मोबाईलद्वारे मनसे सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन करत आहोत. महाराष्ट्राला न्याय देण्याची धमक केवळ राज ठाकरे यांच्यात आहे. सध्याच्या त्रिपक्षीय आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने जनतेला फसवले. अधिवेशनात जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून वैयक्तिक हेवेदावे विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांनी लावून धरले. वीजबिल न भरल्यास कनेक्शन तोडण्याचे आदेश देत राज्य सरकार जनतेला अंधारात ठेवत आहे. जनतेच्या प्रश्नांवर सडेतोड भूमिका घेत सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर राज ठाकरे यांनी कायम आवाज उठवला. राज्यातील जनतेला राज्य सरकारपेक्षा राज ठाकरेंवर जास्त विश्वास आहे. त्यामुळे सिंधुदुर्गवासीयांनीही मोबाईल वर वेबसईटद्वारे ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन उपरकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + 16 =