राजमाता श्रीमंत सत्वशीलादेवी भोंसले यांची 91 वी जयंती महाविद्यालयामध्ये साजरी करण्यात आली.
सावंतवाडी
राजमाता श्रीमंत सत्वशीलादेवी भोंसले यांची 91 वी जयंती श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये साजरी करण्यात आली.
राजमातांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना आदरांजली देण्यात आली.याप्रसंगी संस्थेचे कार्यकारी सदस्य श्री जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत,संचालक प्रा. डी टी देसाई, सहाय्यक संचालक अॅड.शामराव सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल, यावेळी महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे समन्वयक डॉ. बी एन हिरामणी यांनी राजमातांच्या कार्याचा परिचय करून दिला. श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जडणघडणीमध्ये राजेसाहेब श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांच्या बरोबरीने त्यांनी काम केले.त्याचबरोबर सावंतवाडी मध्ये लुप्त होत चाललेली गंजिफा व लाखकलेला उर्जितावस्था प्राप्त करून त्याला राजाश्रय देण्याचं काम त्यांनी केलं. स्थानीक कलाकारांना रोजगार उपलब्ध करून दिला व सावंतवाडीची हस्तकला ही जगभरामध्ये पोहोचविण्याचा काम त्यांनी केले असे ते म्हणाले.
