You are currently viewing एसटी बसला मोटारसायकलची धडक; आरोपीची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

एसटी बसला मोटारसायकलची धडक; आरोपीची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

एसटी बसला मोटारसायकलची धडक; आरोपीची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता


दारूच्या नशेत वाहन चालविल्याच्या आरोपात ठोस पुरावा सिद्ध न झाल्याने अमित गोसावी यांना दिलासा

बचाव पक्षातर्फे अॅड. अशपाक शेख यांनी पहिले काम


ओरोस :

एसएसपीएम हॉस्पिटल, पडवे येथील बस थांब्यावर एसटी बसला मोटारसायकलने धडक दिल्याच्या अपघातप्रकरणी आरोपी अमित गणपत गोसावी यांची मा. मुख्य न्यायदंडाधिकारी, ओरोस श्री. ए. जी. देशिंगकर यांनी दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी निर्दोष मुक्तता केली.
दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मालवण आगाराची एसटी बस क्रमांक MH-14-BT-2693 कणकवलीहून मालवणच्या दिशेने जात होती. एसएसपीएम हॉस्पिटल, पडवे येथील अधिकृत बस थांब्यावर प्रवासी उतरण्यासाठी बस थांबविण्यात आली असताना समोरून आलेल्या बजाज पल्सर मोटारसायकल क्रमांक MH-07-AP-5596 ने बसच्या पुढील बाजूस धडक दिल्याचे तपासात नमूद करण्यात आले होते.
या अपघातात मोटारसायकल चालक जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी एसएसपीएम हॉस्पिटल, पडवे येथे दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीदरम्यान संबंधित व्यक्तीने मद्यप्राशन केल्याचा वैद्यकीय अभिप्राय देण्यात आल्याचे तपास कागदपत्रांमध्ये नमूद करण्यात आले होते.
त्यानंतर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यामार्फत घटनास्थळ पंचनामा, साक्षीदारांचे जबाब तसेच इतर आवश्यक कागदपत्रांच्या आधारे तपास करण्यात आला. तपास पूर्ण झाल्यानंतर प्रकरण मा. मुख्य न्यायदंडाधिकारी, ओरोस यांच्या न्यायालयात चालविण्यात आले.
ठोस पुरावा सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी
न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाकडून साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. मात्र, आरोपीविरुद्ध करण्यात आलेले आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध करण्यासाठी आवश्यक ठोस व सबळ पुरावा न्यायालयासमोर सिद्ध करण्यात सरकारी पक्षास यश आले नाही.
त्यामुळे मा. मुख्य न्यायदंडाधिकारी, ओरोस श्री. ए. जी. देशिंगकर यांनी दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी आरोपी अमित गणपत गोसावी यांची निर्दोष मुक्तता केली. या निकालामुळे अपघात प्रकरणातील आरोपीला न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
बचाव पक्षातर्फे अॅड. अशपाक शेख यांचे काम
या प्रकरणात आरोपीच्या वतीने अॅड. अशपाक शेख यांनी मुख्य काम पाहिले. त्यांना अॅड. नामदेव मठकर, अॅड. पराग नार्वेकर, अॅड. शिवानी जुवेकर, अॅड. पंकज खरवडे, अॅड. विनय रजपूत, ॲड. कैस शेख, अॅड. भूषण कदम आणि ॲड. हरेश वरवडेकर यांनी मोलाचे सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा