फोंडाघाटातील महावितरणचा अजब कारभार; वीज ग्राहकांमध्ये तीव्र संताप
काल बिल वसुली, आज वीजपुरवठ्याचा दणका; सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी देणार निवेदन
फोंडाघाट : फोंडाघाट परिसरातील महावितरणच्या कारभाराबाबत नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. काल वीज बिलांची वसुली करण्यात आली, तर आज वीजपुरवठ्यातील बिघाडामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागल्याचा आरोप होत आहे.
महावितरणच्या वेळापत्रकाबाबतही नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, सकाळी ८.५० वाजेपर्यंतच्या वेळेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याची चर्चा आहे. वारंवार होणाऱ्या वीजपुरवठ्यातील व्यत्ययामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून, महावितरणच्या या अनागोंदी कारभाराविरोधात वीज ग्राहकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
या प्रकाराची गंभीर दखल घेत सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी हे संबंधित विभागाकडे निवेदन देणार असल्याचे समजते. महावितरणने वीजपुरवठ्याबाबत स्पष्टता देऊन नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी होत आहे.
