You are currently viewing पाया पडली शांत मनाने
Oplus_16908288

पाया पडली शांत मनाने

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पाया पडली शांत मनाने*

 

असली प्रतिक्षा जरी कुणाची

नटायला लागतो *वेळ खूप*

सख्खी मैत्रीण असली तरी

आरसा सांगून *बसतो चूप*

//1//

चापून चोपून साडी हिरवी

आज नेसली पंचांग पाहून

केस मोकळे सोडून सारे

नाही गेली ती *वैतागून*

//2//

मतलब असता मनात काही

नाही लागत गजरा *सुगंधी*

अत्तर *शिंपून* साडी वरती

साधायची असते संधी साधी

//3//

लक्ष ठेवून पुढील *दारी*

आरसा देतो *साथ जरी*

बशी पडते कांदापोह्याची

धक्का लागून मधल्या दारी

//4//

यशस्वी होता गूज मनीचे

आरसा हसतो मोठ्याने

ऐकून टाळ्या होकाराच्या

पाया पडली शांत मनाने

//5//

 

विनायक जोशी🖋️ ठाणे

30/089324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा