ठाणे :
समर्थ कट्टा ह्या उपक्रमा अंतर्गत चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट वृंदावन विश्व आणि नाट्यतुषार या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात शनिवारी २९ ऑगस्ट २०२६ ला सायंकाळी चार ते आठ या वेळेत वृंदावन मंगल कार्यालयाच्या सभागृहात विद्यार्थ्यांकरता श्लोक तथा स्तोत्र स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत एकंदर ५३ विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र गोसावी नाट्य तुषार, रुपेश पवार चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट व चित्तरंजन सामंत वृंदावन विश्व हे होते. या स्पर्धेचे परीक्षण सौ नीता माळी व श्री इंद्रजीत सर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन , साहित्यिका मनीषा चव्हाण यांनी केले.
या स्पर्धात्मक कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून, मराठी ग्रंथ संग्रहालयाचे माजी अध्यक्ष विद्याधरजी ठाणेकर उपस्थित होते. ते म्हणाले मुलांना आपली संस्कृती आणि आपले संस्कार जाणून घेण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाची आवश्यकता आहे. हे बोलताना त्यांनी राजेंद्र गोसावी, रुपेश पवार, मनीषा चव्हाण ,चित्तरंजन सामंत यांचे कौतुक केले. कारण या चौघांनी मिळून हा स्पर्धात्मक कार्यक्रम ठाण्यात घडवून आणला. नाट्य तुषारचे संचालक राजेंद्र गोसावी यांनी रुपेश पवार आणि चित्तरंजन सामंत ,स्वप्ना गायकवाड, पूनम, श्रृती,यांचे आभार मानले .त्यांच्या सहकार्यातून मी हा कार्यक्रम घडवून आणू शकलो! असे गोसावी सरांनी सांगितले. रुपेश पवार म्हणाले आपल्या हिंदू धर्मात श्लोक व स्तोत्र पूर्वी आणि आजही घराघरात बोलली जातात. ती मुलांपर्यंत पोहोचवण्या करता हा आम्ही प्रयत्न केला तो प्रयत्न यशस्वी झाला आहे. हा कार्यक्रम राजेंद्र गोसावी. यांच्यामुळे आयोजित झाला असे पवार यांनी सांगितले व पुढे रुपेश पवार यांनी चित्तरंजन सरांचे आभार मानले त्यांनी ही कल्पना आमच्यापर्यंत पोहोचवली. चित्तरंजन सरांच्या टीमने या कार्यक्रमासाठी भरपूर मेहनत घेतली.
ही स्पर्धा दोन गटात झाली. पाचवी ते सातवी या गटात. प्रथम पारितोषिक किमया महाडेश्वर, दुतीय: गौरी कदम, तृतीय: आराध्या चव्हाण व उत्तेजनार्थ: तेजस्विनी देशमुख यांना मिळाले तर आठवी ते दहावी या गटात. प्रथम पारितोषिक समर्थ काटे , दुतीय पारितोषिक स्वराली मोरे, तृतीय पारितोषिक आज्ञा जगताप, उत्तेजनार्थ पारितोषिक सानिका झेंडे यांना मिळाले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करताना दोन्ही परीक्षक म्हणाले. अशा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आपला सहभाग अशा प्रकारे दिला पाहिजे. आपल्याला बोलता येईल न येईल ही गोष्ट येथे महत्त्वाची नाही आहे. येथे आपली अंगभूत कला सादर करायची हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना नेहमी असे प्रोत्सानाचे पाठबळ दिले पाहिजे. यावेळी अभिनेते,निवेदक,व युवा उद्योजक सुमित चोणकर यांनी विद्यार्थ्यांना अभिनय कले संदर्भात वस्तुनिष्ठ मार्गदर्शन केले. हा संपूर्ण कार्यक्रम पुनम, श्रुती, स्वप्ना या युतींनी सांभाळला होता. उत्कृष्ट नियोजन त्यांनी या कार्यक्रमात केले.
