You are currently viewing जिल्ह्यात चार तालुक्यात पावसाची विश्रांती

जिल्ह्यात चार तालुक्यात पावसाची विश्रांती

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 38.00 मी.मी. पाऊस

सिंधुदुर्गनगरी :
गेल्या चौवीस तासात जिल्ह्यात दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला व कुडाळ तालुक्यात पाऊस झाला असून मालवण, कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यात पावसाने विश्रांती घेतली. दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 38.00 मी.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तसेच जिल्ह्यात सरासरी 11.050  मि.मी. पाऊस झाला असून आतापर्यंत एकूण सरासरी 3944.344 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग  38.00 (4208.00), सावंतवाडी 11.00  (4453.00), वेंगुर्ला 9.40 (3669.20), कुडाळ 30.00 (3844.55), मालवण 0.00 (4692.00), कणकवली 0.00 (3667.00), देवगड 0.00 (3241.00), वैभववाडी 0.00(3780.00), असा पाऊस झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − eight =