You are currently viewing शिवडाव हायस्कूलच्या गणेश दाभोळकरची विभागीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड.!

शिवडाव हायस्कूलच्या गणेश दाभोळकरची विभागीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड.!

कणकवली

नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव या प्रशालेचा विद्यार्थी कु. गणेश विनोद दाभोळकर याने प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे तो आता विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. तो आता विभागीय स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हयाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. तर प्रशालेचा दुसरा विद्यार्थी कु. राहुल सत्यवान वंजारे याने जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. कु. गणेश व कु. राहुल यांना प्रशालेचे मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक श्री. संजय मसवेकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल प्रशालेच्या शालेय समितीच्या अध्यक्षा श्रीम. भाग्यरेखा दळवी, खजिनदार श्री. विद्याधर गांवकर सदस्य श्री. अमेय सावेत व श्री. गणेश म्हसकर तसेच शिवडाव सेवा संघ, मुंबईचे अध्यक्ष श्री. श्रीरंग शिरसाट, कार्याध्यक्ष श्री. मोहन पाताडे, कार्यवाह श्री. काशिराम गांवकर यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × two =