You are currently viewing एक रेशमी धागा

एक रेशमी धागा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*एक रेशमी धागा*

 

जोडतो जिव्हाळा

एक रेशमी धागा

प्रेमाने वागा

बहिणीशी…

 

पाठचा मोठा

असो कोणताही भाऊ

नाते मनमिळाऊ

भावंडांचे…

 

आई बाबांआधी

गोष्ट भावाला सांगते

आनंदी होते

मीही….

 

बहिणींच्या मदतीला

हाक देता धावती

लाभावीण प्रीती

भावाचीच…

 

माहेर लेकीला

जणू कल्पतरू भासतो

मनातील पुरवतो

आशा…

 

कोणत्याही वयात

आठवते रेशमी बंधन

भावबंधांचा सण

नात्यांचा….!!

०००००००००००००

अरुणा दुद्दलवार@✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा