You are currently viewing तलावाला श्रीफळ अर्पण करून नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी

तलावाला श्रीफळ अर्पण करून नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी

तलावाला श्रीफळ अर्पण करून नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी

ग्रामदेवता श्री लिंग माऊली चरणी सर्वांच्या रक्षणासाठी प्रार्थना; तलाव विकास व रोजगारनिर्मितीसाठी उपक्रम

कणकवली:

सालाबादप्रमाणे याही वर्षी तलावाच्या काठावर तलावाला श्रीफळ अर्पण करून नारळी पौर्णिमा ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सर्वांच्या सुख-समृद्धी व रक्षणासाठी ग्रामदेवता श्री लिंग माऊली यांच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.
गावातील उद्योगधंद्यांना चालना मिळावी, तलावाचा मोठ्या प्रमाणात विकास व्हावा तसेच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, या उद्देशाने दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो. परंपरेसोबतच गावाच्या विकासाची भावना जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
नारळी पौर्णिमेनिमित्त तलाव परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पारंपरिक उपक्रमात सहभाग घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा