You are currently viewing कणकवलीत अजित नाडकर्णी यांनी घेतले गणरायाचे दर्शन

कणकवलीत अजित नाडकर्णी यांनी घेतले गणरायाचे दर्शन

कणकवलीत अजित नाडकर्णी यांनी घेतले गणरायाचे दर्शन

सर्वांच्या आरोग्यदायी जीवनासाठी प्रार्थना; संदेश पारकर यांनी आमदार व्हावे, अशीही मनोकामना

कणकवली :

सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी आज कणकवली शहरातील वकील उमेश सावंत, नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या निवासस्थानी तसेच सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी श्री गणरायाकडे सर्वांना आरोग्यदायी व सुखी जीवन लाभावे आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद सर्वांवर कायम राहावा, अशी प्रार्थना केली.
तसेच फोंडाघाट येथील महेश पेडणेकर व संतोष टक्के यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणपती बाप्पांचेही अजित नाडकर्णी यांनी दर्शन घेतले.
यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आगामी काळात आमदार व्हावे, अशी मनोकामनाही अजित नाडकर्णी यांनी श्री गणरायाकडे व्यक्त केली. यावेळी उपस्थितांनी ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा