You are currently viewing कुडाळ येथे डॉक्टर संजय निगुडकर यांच्या श्री गणेश हॉस्पिटल मध्ये दि. १३ व १४ मार्च २०२१ रोजी लहान मुलांच्या आजारावर मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

कुडाळ येथे डॉक्टर संजय निगुडकर यांच्या श्री गणेश हॉस्पिटल मध्ये दि. १३ व १४ मार्च २०२१ रोजी लहान मुलांच्या आजारावर मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

कुडाळ :

 

बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था आणि कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गिरगाव, रोटरी सेवा प्रतिष्ठान कुडाळ, रोटरी क्लब कुडाळ ,राष्ट्रीय बालविकास कार्यक्रम व आरोग्य विभाग सिंधुदुर्ग सुशिला गणेश निगुडकर ट्रस्ट कुडाळ, तसेच कुडाळ मेडिकल असोसिएशन व स्त्रीरोगतज्ज्ञ संघटना सिंधुदुर्ग, आणि जिल्ह्यातील सर्व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक १३, व रविवार दिनांक १४ मार्च २०२१ रोजी मुंबई येथील सुप्रसिद्ध बालरुग्ण शल्यचिकित्सक डॉ. संजय ओक यांच्या हस्ते लहान मुलांच्या आजारावर मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे कुडाळ येथील डॉ. संजय निगुडकर यांच्या  हॉस्पिटलमध्ये आयोजन करण्यात आलेले आहे. *काही अपरिहार्य कारणाने २०- २१ फेब्रुवारीला सदर शिबीर होऊ शकले नव्हते ते आता वरील तारखांना होणार आहे.* गेली तीन वर्षे अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने घेण्यात येणाऱ्या या लहान मुलांच्या आजारावरील तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरामध्ये डॉ. पारस कोठारी, डॉ. अभय गुप्ता, डॉ. मनिष कोटवाणी हे प्रसिद्ध बालरुग्ण चिकित्सक उपस्थित राहणार आहेत. या शिबिरामध्ये हर्निया, हायड्रोसिल्स, अनडिसेंडेड  टेस्टिस, बायोप्सी  इत्यादी आजारावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तर या संदर्भातले आजार असलेल्या पालकांनी आपल्या मुलांना घेऊन शनिवार दिनांक १३ मार्च रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत श्री गणेश हॉस्पिटल कुडाळ हिंदू कॉलनी येथे उपस्थित राहायचे आहे. मात्र त्यासाठी अगोदर नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी (तपासणी निश्चितीसाठी ) खालील नंबर वर संपर्क साधावा.. दूरध्वनी क्र.०२३६२-२२२०४७/२२१६४७/२२१०७३ ( अधिक संपर्कासाठी डॉक्टर अमोघ चुबे -०२३६२-२२११६९, डॉक्टर जयसिंह रावराणे-०२३६२-२२२४०१), असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − six =