You are currently viewing दिपाली भालेकर यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती नागरिकांच्या कागदपत्रांच्या साक्षांकनासाठी पाच वर्षांची नियुक्ती

दिपाली भालेकर यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती नागरिकांच्या कागदपत्रांच्या साक्षांकनासाठी पाच वर्षांची नियुक्ती

दिपाली भालेकर यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती
नागरिकांच्या कागदपत्रांच्या साक्षांकनासाठी पाच वर्षांची नियुक्ती

सावंतवाडी

सावंतवाडी येथील श्रीमती दिपाली दिलीप भालेकर यांची महाराष्ट्र शासनाच्या वतीने विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांच्या विविध आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकनासाठी ही नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचा कार्यकाळ ४ ऑगस्ट २०२६ ते ३ ऑगस्ट २०३१ असा पाच वर्षांचा राहणार आहे.
याबाबतचे नियुक्ती प्रमाणपत्र सिंधुदुर्गचे अपर जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहे. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नागरिकांना आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकनाची सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी दिपाली भालेकर यांच्यावर राहणार आहे.
त्यांच्या नियुक्तीमुळे नागरिकांना कागदपत्रांच्या साक्षांकनासाठी सुलभ व वेळेवर सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. दिपाली भालेकर यांच्या नियुक्तीबद्दल सावंतवाडी परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा