*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम लेख*
* *चिट्ठी न कोई संदेश*
१९९८ च्या दुश्मन चित्रपटातील हे गाणे जगजीत सिंह ह्यांनी गायले असून गीतकार आनंद बक्षी व संगीतकार उत्तम सिंह आहेत
जगजितसिंह आणि चित्रा सिंह यांचा मुलगा विवेक सिंह याचा १०९० मध्ये वयाच्या सुमारे २०व्या वर्षी अपघाती मृत्यू झाला होता
त्यामुळे हे गाणे त्यातील शब्द जगजितसिंह जींच्या भावनेशी जुळणारे आहे
हे गाणे चित्रपटात एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या जवळच्या व्यक्तीच्या मनाची काय स्थिती होते हे प्रभावीपणे स्पष्ट करते ह्यात प्रियकर प्रेयसीच्या विरह दुःखा पेक्षा आपले माणूस गमावल्यावर होणाऱ्या असह्य वेदना व्यक्त केल्या आहेत त्यामुळे ते हृदयाला अधिकच भिडते
सुरवातीला कवी म्हणतो–
*चिट्ठी न कोई संदेश जाने कैसा वो देश जहां तुम चले गये*
अर्थ अगदी सोपा आहे –
ज्याच्यावर आपले जीवापाड प्रेम आहे तो अचानक आपल्यापासून दूर गेला त्याच्याकडून काही खबर, संदेश पत्र काही नाही कुठे गेला असेल अशी मनाची घालमेल झालेली! जाने कौनसा देश म्हणजे तो सध्या ज्या जगात गेला ,तिथे आपण नाही जाऊ शकत, दिलपे लगाकर ठेस म्हणजे मनाला झालेली खोल जखम भरून येणे अशक्य!
कवीला वाटते कीआता तुझ्याधी संपर्क करणे अशक्य आहे, पुढे कवी म्हणतो,
*एक आह भारी होगी, हमने न सुनी होगी –* अतिशय हृदयाला भिडणाऱ्या शब्दात कवी दुःखाने म्हणतो की जातांना त्या व्यक्तीने एक सुस्कारा सोडला असेल आपल्याला आवाजही दिला असेल की, जो आपण ऐकू शकलो नाही आणि मन अपराधी होऊन विचार करते–*उस वक्त कहा थे हम–* काश मी तिथे असतो तर ही त्यामागची भावना! आपली प्रिय व्यक्ती नेहमीसाठी आपल्याला सोडून गेली आणि आपण तिच्याशी बोलू शकलो नाही ह्याचे अतीव दुःख ह्या दोन ओळीत स्पष्ट जाणवते
पुढे कवी म्हणतो *हर चीजपे अष्को से लिख्खा है तुम्हारा नाम* संपूर्ण वातावरणात त्या व्यक्तीच्या आठवणी पसरल्या आहेत घर, गल्ल्या, रस्ते , प्रत्येक ठिकाणी गेलेल्या व्यक्तीसोबतची आठवण आहे तिथे तिथे त्याची अनुपस्थिती जाणवते आहे
मनातले बोलायचे राहून गेले आहे,वत्याचा नीट निरोपही घेता आला नाही हेशल्य मनाला कायम टोचत राहणार आहे
शेवटीं कवी म्हणतो-*अब यादोके कांटे, इस दिलमे चुभते है*-
मनाला झालेले तीव्र दुःख असहनिय आहे, जिच्यावर प्राणापलिकडे प्रेम केले ती व्यक्ती आता कधीच दिसणार नाही अति दुःखाने अश्रू थांबत नाहीत दयनीय अवस्थेत कवी म्हणतो माझे प्रेम सैरभैर होवून तुला शोधते आहे पण तू दिसत नाही, दिसणारही नाही काय करू आणि काय नाही अशा विकल
अवस्थेत कवी पुन्हा पुन्हा म्हणतो *चिठ्ठी न कोई संदेश जाने कैसा वो देश जहां तुम चले गये*
माझ्या मते आनंदबक्षीच्या या गीताची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांनी एकदाही मृत्यू हा शब्द न वापरता गेलेल्या व्यक्तीबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्यात आणि जगजीत सिंहचयव आवाजाने त्यांच्या शब्दांना खोल दुःखाची छटा दिली
हे गाणे जगजितसिंहानी लिहिलेले नाही १९९० मध्ये वयाच्या २० व्या वर्षी त्यांच्या मुलाचे अपघाती निधन झाले आनंद बक्षीनी लिहिलेले हे गीत त्यानी अपल्या मुलाच्या मृत्यूच्या दुःखात अतिशय व्याकुळतेने गायले व ते त्यांच्या मुलाच्या स्मृतीशी जोडले गेले आहे
मी जेव्हा जेव्हा हे गाणे ऐकते तेंव्हा तेंव्हा ते मला स्वतःचे वाटते
या गीतातील प्रत्येक शब्द काळजाला पीळ पाडणारा,
आपला वाटणारा आहे
आणि सहज ओठावर येते
*कहा तुम चले गये*
प्रतिभा पिटके
अमरावती
_________________________
*संवाद मीडिया*
✨ *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* ✨
“जग तुमची वाट पाहत आहे…”
🏖️ देश असो वा परदेश — तुमच्या प्रत्येक प्रवासाची संपूर्ण सोय एकाच ठिकाणी !
📝 *आमच्या सेवा :*
🛂 पासपोर्ट हेल्पडेस्क
🛃 व्हिसा हेल्पडेस्क
🇮🇳 भारतीय सहली
🌎 परदेशी सहली
✈️ विमान तिकीट बुकिंग
🚆 रेल्वे तिकीट बुकिंग
🚌 बस तिकीट बुकिंग
💸 मनी ट्रान्सफर
💱 करन्सी एक्सचेंज
🛡️ ट्रॅव्हल इन्शुरन्स
🛳️कॉर्डेलिया क्रूज बुकिंग
🏨 हॉटेल बुकिंग
🚗 कार ऑन रेंट
🚤 हाऊसबोट बुकिंग
🌟 फॅमिली ट्रिप | हनिमून | धार्मिक यात्रा | ग्रुप टूर | देश-विदेश प्रवास 🌟
📞 आजच संपर्क करा!
*7350 7350 91 // 7350 534 534*
📍 *कणकवली, सिंधुदुर्ग*
✈️प्रवास सुखाचा, आठवणी आयुष्यभराच्या!✈️
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/211736/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
