You are currently viewing मागोवा (सिंहावलोकन) बदलत्या गतकाळाचा..

मागोवा (सिंहावलोकन) बदलत्या गतकाळाचा..

*वक्रतुंड साहित्य समूहाचे संस्थापक अध्यक्ष लेखक कवी डॉ.जगन्नाथ खराटे लिखित अप्रतिम लेख*

 

*मागोवा (सिंहावलोकन) बदलत्या गतकाळाचा..*

 

 

दिवसामागून दिवस,अन् वर्षामागुन वर्षे सरुन जातात, एकेक क्षण हा सतत बदलत असतो.त्याजागी नवा क्षण येतो.खरंतर,बदल हा सृष्टीचा एक अलिखित नियम आहे. त्यानुसार हे सारं निसर्गचक्र सतत बदलतं असतं. ह्या बदलांमुळेंच जीवनातील जुणी परिस्थिती बदलुन नवीन परिस्थिती,नवीन संकटं,नवीन आव्हानं,समस्या आणि बदल हे सृष्टीत होतात. तसेच ह्यातील काही सकारात्मक बदल हे सृष्टीतील मानवेतर जिवसजींवाना नवसंजीवनी बहाल करणारे ठरतात, प्रेरणा दायी ठरतात.तर काही नकारात्मक बदल हे आव्हान दायी करतात,..सकारात्मक बदल मानवी जीवनाच्या प्रगतीपथासाठी दीपस्तंभ ठरतात हे मात्रं निस्चिंत… हे असं का घडतं ? खरंतर हेंच एक ईश्वरी रहस्य आहे. हे एक कोडं आहे..अन् हे कोडं सोडवण्यासाठींच परमेश्वराने आपल्याला मानवी आयुष्य बहाल केलंय..

 

मानव हा जन्मतःच सहजीवनप्रिय प्राणी असल्यामुळे तो अगदी पाषाणयुगापासुन तर सध्याच्या यंत्रयुगापर्यत परस्परांच्या सानिध्यात राहून सहजीवनाचा आनंदाचा आस्वाद घेत आला आहे..

ह्या सहजीवनाचा आनंद घेत असताना,त्याला अनेक प्रकारच्या समस्या, संकटांना सामोरं जावं लागलं आहे, तरी अजुनही ही संकटे,समस्या नवनवीन रुपात बदलुन पाठ पुरावा सोडतं नाही हे अगदी खरं आहे…

आहार,निद्रा,भय,मैथुन ह्या जिवसजींवाच्या प्राथमिक गरजापुर्तीसाठी प्रत्येकजीव जन्माला आल्यापासुन धडपडतो. किंबहुना ह्या गरजा जिवनाच्या अविभाज्य भाग बनुन राहील्या आहेत,..

 

पन् हळुहळु काळचक्र बदलतं असते,बदल हा काळाचा नियम असल्याने सर्वच सजीवांना काळानुसार बदलनं गरजेचे ठरलं. त्यानुसार तो बदलतं गेला.. तसंच अजुनही आपल्या बुद्धीनुसार संकटांवर मात करीत आहेत..

 

मानवप्राणी ह्या सर्वांपेक्षा बुद्धीने श्रेष्ठ असुनही मात्रं त्याला,इतरांपेक्षा जास्तीत जास्त संकटांना सामोरे जावं लागतं आहे, तसंच,निसर्गाच्या जिवसजींवासाठी सुद्धा ही संकटं, समस्या दुःखमय ठरलेल्या आहे, हे एक भिषन असं कटु सत्य आहे…

 

पुर्वीच्या काळी मानवासाठी, अन्न,वस्त्र,निवारा ह्या अत्यावश्यक अशा सिमित गरजा होत्या,ह्या गरजेपोटी तो अनेक समस्या,संकटांवर मात करुन अगदी आनंदी जीवन जगंत होता.पन् हळुहळु काळचक्र बदलतं गेलं आणि लोकसंख्या वाढत गेली, तसतशी मानवी गरजांची व्याप्ती वाढली.अन्न,वस्त्र निवारा ह्यामध्ये हळुहळू बदल होत गेले,..

 

अन्न, ह्या प्राथमिक गरजेची व्याक्ती वाढत गेली मानवाच्या आहारासबंधीच्या सवई बदलल्या,जिभेचे चोचले पुरवण्यासाठी शेतात नवनवीन अन्नधान्याची निर्मिती करावी लागली, लवकर पिक यावे ह्यासाठी सेंद्रिय खते ह्याचा वारेमाप वापर करुन सेंद्रिय पिक घ्यावे लागले..पर्यायाने शेतीचा कस कमी होवून कमी वेळात निसत्व अन्नधान्याने,शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली.पर्यायाने नवनवीन रोगांमुळे मानवी आरोग्य धोक्यात येवु लागले. असं वैद्यकीय निरिक्षणातुन सिद्ध होतांना दिसतं..

वस्त्र,संसाधने यंत्रसामग्री, उद्योगधंदे,ह्यासंबंधी नवनवीन तंत्रज्ञानाचा विस्तार होऊन, यांत्रिकीकरणामुळे, मनुष्यशक्तीत घट होवून मनुष्यबळाचा वापर कमी होत जावुन,पर्यायाने बेरोजगारी वाढली.परिणामी मनुष्याला महागाईचे चटके सोसावे लागत आहे.यांत्रिकीकरणाने जरी मानवी जीवन हे प्रगतीपथावर असलं तरी यांत्रिकीकरण,उद्योगधंदे, ह्यामुळे वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण,जलप्रदूषण इत्यादी गोष्टीं निसर्गाच्या र्हासास कारणीभूत ठरल्याचे निदर्शनास येत आहे,

लोकसंख्यावाढीमुळे निवारा, ही अत्यावश्यक अशी गरज भासु लागली,पर्यायाने गावांची जागा शहरांनी घेतली, वस्तीसाठी जागा अपुरी पडल्यामुळे मानवाचे पाऊल हे निसर्गाकडे वळले निसर्गातील वनसंपदा, जलाशय,शेती इत्यादी ठिकाणी सिमेंट क्रमांकाच्या गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या. निवारा ह्या अत्यावश्यक गरजांची व्याप्ती इतकी वाढली की त्यामुळे वृक्षसंपदा नष्ट होवु लागली.पर्यायाने जलप्रदूषण वायुप्रदूषण होवुन मानवी जीवनाचा प्राण असलेला ऑक्सिजन,पाणी ह्यांचे प्रमानं कमी होऊन, येत्या पुढील काळात शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी ह्यांचे दुर्भिक्ष्य जाणवत मानवी जीवनाचे अस्तित्व नष्ट होईल अशे जागतिक हवामान तज्ञा़ंचे अंदाज वर्तविण्यात येत आहे..

 

खरं तर हे सर्व बदल घडण्यासाठी, कारणीभूत असलेल्या आपन सर्व मानवसमाजांनी आपल्या गतकाळातील जीवनशैलीचा मागोवा घ्यायला हवा. किंबहुना प्रगतीकडे वाटचाल करीत असताना थोडंसं सिंहावलोकन करणं गरजेचं ठरलेलं आहे,निसर्गातील सकारात्मक तसेच विनाशकारी बदल घडवण्यासाठी आपण सारे कारणीभूत ठरलो आहोत हे लक्षात घ्यायला हव..

निसर्गचक्रानुसार सकारात्मक बदल हे हितावह ठरले आहे. तसं बघायला गेलं तर निसर्गाच्या र्हासासाठी अनेक कारणे असली तरी मानवी हव्यास हे एकमेव महत्त्वाचं कारण आहे असं मला वाटतं..कारण पुर्वीच्या काळी मानवांच्या गरजा सिमित होत्या..पन् हळुहळू मनुष्याच्या गरजा वाढु लागल्या मनुष्य हा स्वच्छंदी आणि मनमौजी बनु लागला आपल्या शारीरिक सुखासाठी त्यांच्या आहार,विहार ,आचार विचारांना,कसलीही सीमा ऊरली नाही.अगदी स्वार्थापोटी वृत्तीने जगण्याच्या इच्छापूर्तीसाठी ,तो वृक्ष, वनस्पती,प्राणी,जलचर, ह्या निसर्गसंपदेचा र्हास करुन, स्वैराचाराने अनिर्बंध वागु लागला अन् हेंच अनिर्बंध आचरण मनुष्याला तसेच निसर्गाच्या र्हासासाठी कारण ठरलं ,पर्यायाने अवकाशात झेप घेणारृया यंत्रयुगातील मानवाची गरुड झेप ही विनाशाकडे जाते की काय? असा संशय येतो.. निसर्गचक्रांत ढवळाढवळ करणे हे विनाशाची चाहुल आहे हे खरोखरच हे एक कटु सत्य आहे ..

 

बदलत्या काळानुसार निसरगनियमांतील मानवी हस्तक्षेपांच्या ह्या सर्व गोष्टींचे मागोवा घेणे किंवा सिंहावलोकन करुन त्यातील नकारात्मक गोष्टींचा त्याग करणे हे भावी काळासाठी प्रगतीसाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.अन त्यासाठी

आपल्या गरजांवर आणि निसर्गाच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी सर्वांनी पुढे यायला हवं हे कटु सत्य स्विकारायलं हवं.

 

जगन्नाथ खराटे-ठाणे..

 

 

*संवाद मिडिया*

 

*Job Vacancy !! Job Vacancy !!*👩🏻‍💻🧑‍💻👨‍💻

 

*सविस्तर वाचा 👇*

————————————————–

😇 *LIFE GOALS DONE*😇

 

*Bajaj Allianz Life Insurance Co. Ltd.*

 

🧑‍💻👩🏻‍💻 *Job Vacancy*👩🏻‍💻🧑‍💻

 

▪️Part Time / Full Time

▪️Earn Extra Income

▪️Post – Agency Sales Officer

▪️Qualification – 12th Above

▪️Fix Salary – 30,000/- ▪️Work Day / Training / Support Provided

▪️Employees / Housewife / Retired Person / Businessman / Professionals

 

📱Branch Head – 8087757388, 8550934448

 

*Bajaj Allianz Life Insurance Co. Ltd.*

🏢 Job Location – Sawantwadi

🏢 Branch Office – Mapusa, Goa

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 4 =