You are currently viewing त्या एस टी चालकावर कारवाई करण्यात यावी;आखवणे गुरववाडीतील पालकांची मागणी

त्या एस टी चालकावर कारवाई करण्यात यावी;आखवणे गुरववाडीतील पालकांची मागणी

आठवडा बाजारा दिवशी झालेल्या या प्रकारामुळे पालक व ग्रामस्थ संतप्त

वैभववाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासनाच्या मानव विकास योजनेअंतर्गत शाळकरी विद्यार्थ्यांना एस टी बस ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
काल बुधवारी वैभववाडी- मौंदे या मार्गावरील मानव विकास ची बस दुपारच्या वेळी चालकाने ‌आखवणे – गुरववाडी मार्गे न घेऊन जाता. विद्यार्थ्यांना मौंदे येथील पुलाजवळ उतरविण्यात आले. काल वैभववाडी चा आठवडा बाजार असल्याने घरचा खरेदी केलेला बाजार शाळेचे दप्तर घेऊन भर उन्हात विद्यार्थ्यांना साधारण 2 कि.मी. पायपीट करत गुरवाडी पर्यंत घरी जावे लागले. विद्यार्थ्यांबरोबर इतर प्रवाशांना देखील याचा नाहक त्रास सहन करावा लागला.
त्या चालकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालक करत आहेत. तर असे प्रकार पुन्हा घडल्यास सामाजिक कार्यकर्ते नवनाथ गुरव यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + 14 =