You are currently viewing फोंडाघाटमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचा ग्राहक मेळावा व स्नेहमेळावा संपन्न

फोंडाघाटमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचा ग्राहक मेळावा व स्नेहमेळावा संपन्न

फोंडाघाटमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचा ग्राहक मेळावा व स्नेहमेळावा संपन्न

फोंडाघाट :

येथील हॉटेल रिलॅक्स येथे बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीने ग्राहक मेळावा व स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला फोंडाघाट परिसरातील व्यापारी, उद्योजक तसेच बँकेचे ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रत्नागिरीहून उपस्थित राहिलेल्या बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बँकेची ध्येय-धोरणे, ग्राहकांसाठीच्या विविध योजना आणि बँकेच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी फोंडाघाट शाखेचे शाखाधिकारी डॉ. रवी गायकवाड यांनी बँकेच्या विविध कर्ज योजनांची माहिती देत ग्राहकांनी उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमात अजित नाडकर्णी यांनी बँकेच्या कामकाजातील काही उणिवा तसेच ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या अडचणी व त्रास याबाबत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. ग्राहकांच्या सूचनांची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील आणि ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
फोंडाघाटमधील बँक ऑफ महाराष्ट्र ही सर्वात जुनी राष्ट्रीयीकृत बँक असून, भविष्यात या शाखेचा अधिक विस्तार व्हावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. तसेच बँकेच्या सेवा, सुविधा किंवा कामकाजाबाबत काही सूचना अथवा तक्रारी असल्यास ग्राहकांनी शाखेशी संपर्क साधावा, असे शाखाधिकारी डॉ. रवी गायकवाड यांनी सांगितले.
ग्राहक व बँक प्रशासन यांच्यातील संवाद वाढविण्याच्या दृष्टीने हा मेळावा उपयुक्त ठरला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा