🌳🌺🌹*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*🌹🌸🌺
*”श्रावण रंग”*
श्रावण सृष्टीला रंग रूपाचे वरदान
श्रावण एक वृत्ती आहे स्थायी चराचरांतIIधृII
भूमिला गहिवर फुटे हिरवी तृणपात
आसुसलेली धरा नद्या नाले करी संतृप्त
आनंद वृत्ती प्रसवते सृष्टीच्या गात्रांतूनII1II
आहे रंगबावरा नाद गहिरा गंधभारीत
श्रावण संस्कृती दर्शवी प्रेम रंगांचे सृजन
विविध रंगांचा कल्लोळ करितो उधळणII2II
हिरवीकंच झाडे वेली सुमने डवरतात
उगवती तृणांकुर डोंगरदऱ्या कपाऱ्यांत
मिळतो हरखून टाकणारा गंध सुगंधII3II
श्रावण उर्मी अलवार ओढ करी बेभान
आगमनाने वाटे निसर्ग त्याचे अंकित
मनुष्य पशु पक्षांना देई नेत्र सुख आनंदII4II
चित्रकार कवी कल्पनांना करी प्रोत्साहित
गायक वादक कलासक्तांना करी मोदीत
श्रावणाची आस मोहिनी राहे चिरंतनII5II
श्रावण धर्म आहे त्याला आनंदाचे परिमाण
या हृदयीचा त्या हृदयी साधलेला संवाद
सणांचा महिना देवपूजेने मिळे आनंदII6II
©️काव्य:श्री अरुण गांगल. कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.
