You are currently viewing कथा श्रीराम जन्मभूमीची ।

कथा श्रीराम जन्मभूमीची ।

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ कवयित्री विद्या रानडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कथा श्रीराम जन्मभूमीची ।*

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

 

ऐका कथा श्रीरामजन्मभूमिची

श्रीराम जय राम जय जय राम ।

आयोध्या नगरीत भव्य मंदिर होते प्रभू श्रीरामांचे ।

जन्मभूमी रामांची मंदिर रामलल्लाचे

श्रीराम जय राम जय जय राम

सोळाव्या शतकात सव्वीसाव्या वर्षी

एक क्रूर आक्रमक दिन दिन करत आला

आला मोठा त्वेषाने लढला।

राणा संग्राम सिंह त्यास भिडला

घनघोर युद्ध अन बाबर पराजित झाला

श्रीराम जय राम जय जय राम।

पुन्हा आक्रमण, रणकंदन माजले

दुर्दैव रामभक्तांचे या समयी बाबराने जिंकले ।

सुंदर मंदिर होते प्रभुरामांचे

आदेश सेनापती मीर बांकीस

उद्ध्वस्त करणे मंदिर अन बांधा मशिदीस

श्रीराम जय राम जय जय राम।।

संघर्ष सुरूच राहिला,प्रत्येक रामभक्त लढला

लढता लढता मेला,स्वर्ग प्राप्त केला

रक्ताने भूमी भिजली; लढता लढता मरण्याची शपथ भक्तांनी घेतली

सहस्रावधींनी केले स्वर्गारोहण,केले धर्माचरण

मंदिर उद्ध्वस्त करण्या यश मीर बांकीला

त्यासाठी त्यास दोन वर्षांचा कालावधी लागला

श्रीराम जय राम जय राम जय जय राम।।

धर्मासाठी लढण्या मरण्याची, उर्मी सनातन धर्मी रामभक्तांची

पंडित देवदिन पांडे यांनी सैन्य उभे केले

सत्तर सहस्त्र जवान पाच दिवस लढले

देवदिनने सातशे शत्रूस यमसदनी धाडिले

राणी जयराजकुमारीने तीन सहस्त्र विरांगनांचे सैन्य उभे केले

दहा हल्ले करूनी रणी रक्त सांडले

पन्नास सहस्त्र सैन्य औरंग्याने मशिद रक्षणार्थ धाडले

बाबा वैष्णव दास नि गुरु गोविंदसिंह यांनी भीषण युद्ध केले

दहा सहस्र सैन्य वीरगतीस गेले

श्रीराम जय राम जय जय राम

स्वातंत्र्यानंतरही रामलल्ला परतंत्र राहिले

मुलायमच्या गोळीबारास कारसेवक सामोरे गेले

शरयूचे जल रक्त आणि शरमेने लाल झाले

तीच ती अयोध्याआज नटली सजली आहे

चार लक्ष हुतात्म्यांना ती अर्घ्य देत आहे

आज रामलल्ला स्थानापन्न होणार

पाचशे वर्षांचा अंधार आज लोपणार

अंधाराचे जाळे फिटले, आकाश मोकळे झाले..

 

विद्या रानडे

 

 

*संवाद मिडिया*

 

*सुपर पॉवर, सुपर मायलेज आता X-TECH टेक्नॉलॉजीसह*

 

*ADVT LINK👇*

————————————————

🏍️ *गती नवी…हिरो घरी आणायलाच हवी….🏍️*

 

👉 *हिरो डेस्टिनी प्राईम रुपये 89,999 ऑन रोड🛵*

 

👉 *सुपर स्प्लेंडर व ग्लॅमर वर रुपये 3000 चा कॅश डिस्काउंट🏍️💸*

 

👉 *एक्स्ट्रिम व एक्सपल्स वर रुपये 5000 चा एक्सचेंज बेनिफिट😇*

 

👉 *फ्लिपकार्ट बुकिंगवर भरघोस सुट💥*

 

👉 *एक्सचेंज व फायनान्स ऊपलब्ध 🤗*

 

👉 *ऑफर फक्त 31 जानेवारी पर्यंत*

 

👉 आजच खरेदी करा…📝

 

🎴 *मुलराज हिरो, कुडाळ*

 

📱9289922336, 7666212339

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × three =