You are currently viewing कुडाळ येथे पालकत्व शिक्षणक्रम व मार्गदर्शन समुपदेशन पदविका शिक्षणक्रम सुरु

कुडाळ येथे पालकत्व शिक्षणक्रम व मार्गदर्शन समुपदेशन पदविका शिक्षणक्रम सुरु

कुडाळ :

बॅ. नाथ पै बी एड महाविद्यालय कुडाळ येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक संलग्नित ‘पालकत्व शिक्षणक्रम’ व ‘मार्गदर्शन समुपदेशन पदविका’ शिक्षणक्रमांस सदर विद्यापीठातर्फे नुकतीच मान्यता मिळाली आहे.

आज पालक यांच्यामध्ये ताण, तणाव निर्माण होत आहे. त्यासाठी शास्त्रशुद्ध पालकत्वाची गरज आहे. पालक शिक्षणाचा संख्यात्मक विस्तार करणे, गुणात्मक, दर्जात्मक पालक शिक्षण देणे ही आपली बांधिलकी आहे. त्यासाठी दर्जेदार पालक शिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक चा पालकत्व शिक्षण शिक्षक व पालकांना उपयोगी पडणार आहे. हा प्रमाणपत्र शिक्षणक्रम पालकांसाठी उपयोगी ठरणार आहे.या शिक्षणक्रमांतील मार्गदर्शन मुलांच्या वाढीतील प्रत्येक टप्प्यात योग्य निर्णय घेण्यासाठी, बालकांतील कौशल्य आकलन, डिजिटल युगातील आव्हानांचा सामना तसेच परिवारातील आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याची कला या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला आहे.

*मार्गदर्शन व समुपदेशन कोर्स* – तसेच विद्यार्थ्यांपासून वृद्धापर्यंत सर्व स्तरावर तणावाचे प्रमाण समाजात वाढत असल्याचे दिसते. ते दूर करण्यासाठी मार्गदर्शन व समुपदेशनाची अत्यंत आवश्यकता आहे. यासाठी प्रशिक्षित तज्ञ समांतर व समुपदेशक असे मनुष्यबळ तयार करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून’ मार्गदर्शन व समुपदेशन’ या एका वर्षाच्या मार्गदर्शक पदविका शिक्षण क्रमाची सुरुवात बॅ.नाथ पै बी. एड. महाविद्यालयात सुरू करण्यात आली आहे.

तरी इच्छुकानी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन चेअरमन उमेश गाळवणकर, केंद्रप्रमुख परेश धावडे, केंद्र समन्वयक नितीन बांबार्डेकर यांनी केले आहे.अधिक माहिती साठी 9325104684 या नंबर वर संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा