You are currently viewing फोंडाघाटमधील विजेची लपाछपी कधी थांबणार?

फोंडाघाटमधील विजेची लपाछपी कधी थांबणार?

फोंडाघाटमधील विजेची लपाछपी कधी थांबणार?

वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त; महावितरणकडून कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी

फोंडाघाट :

फोंडाघाट परिसरात गेल्या काही काळापासून वीजपुरवठ्याचा सुरू असलेला लपाछपीचा खेळ कधी थांबणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वारंवार वीज जाणे आणि काही वेळाने पुन्हा येणे यामुळे घरगुती ग्राहकांसह दुकानदार, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नेमका किती वेळात वीज पूर्ववत होणार, याबाबत स्पष्ट माहिती मिळत नसल्याचीही नागरिकांची तक्रार आहे.

वारंवार होणाऱ्या वीजखंडित समस्येमागील नेमके कारण शोधून वीज वितरण यंत्रणेची आवश्यक दुरुस्ती व देखभाल करण्यात यावी. तसेच भविष्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होणार नाही, यासाठी महावितरणने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी फोंडाघाटवासीयांकडून होत आहे.

“वीज बिल वेळेवर भरतो, मग सुरळीत वीजपुरवठा मिळणार कधी?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत असून संबंधित विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.सामाजिक कार्यकर्ते यांनी याला पाठिम्बा दर्शवीला आहे.ऑनलाईन अदानी मीटर गाळ्यात घातलेने बिलाही ज्यादा येते.आणि 1 महिन्याचे बिल rahile तर लीगतही बॅ द होते.अजब कारभार चालु आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा