You are currently viewing ‘सेवा अभियान’अंतर्गत प्रलंबित कामांची निवेदने स्वीकारणार

‘सेवा अभियान’अंतर्गत प्रलंबित कामांची निवेदने स्वीकारणार

‘सेवा अभियान’अंतर्गत प्रलंबित कामांची निवेदने स्वीकारणार

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडीत उपक्रम; प्रमोद जठार, संतोष साखरे निवेदने स्वीकारणार

सावंतवाडी

भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार मा. श्री. रविंद्र दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘सेवा अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रलंबित कामांबाबतची निवेदने स्वीकारण्यात येणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या प्रलंबित कामांची निवेदने ‘मा. प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश’ यांच्या नावाने सादर करावीत, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत यांनी केले आहे.
‘सेवा अभियान’ अंतर्गत महाराष्ट्र विधान परिषद सदस्य, भाजपा कोकण विभागाचे संयोजक तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता श्री. प्रमोद जठार आणि श्री. संतोष साखरे नागरिकांची निवेदने स्वीकारणार आहेत.
हे अभियान सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत बॅरिस्टर नाथ पै व्यासपीठ, सावंतवाडी येथे होणार आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या प्रलंबित समस्या व कामांसंदर्भातील निवेदने घेऊन या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा