You are currently viewing वेरली येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरुण उर्फ बाळा परब यांचे दुःखद निधन

वेरली येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरुण उर्फ बाळा परब यांचे दुःखद निधन

मुंबई : मालवण तालुक्यातील वेरली येथील इनामदार घराण्यातील ज्येष्ठ सदस्य अरुण उर्फ बाळा भिकाजी परब (७०) यांचे मुंबई येथे दीर्घ आजाराने निधन झाले. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सक्रीय सहभाग असायचा, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते निष्ठावंत शिवसैनिक होते.

मुंबई पोर्ट ट्रस्ट सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी मुंबई तसेच वेरली येथे होणाऱ्या विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग होता.

मुंबई विद्याविहार येथील देवी मरिआई सेवा मंडळाचे ते अध्यक्ष होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, भाऊ, भावजय, बहीण, भाचे व पुतणे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते अर्जुन परब यांचे ते बंधू, वेरली ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या अरुणा परब यांचे ते पतीतर संवाद मिडियाच्या ब्युरो चीफ विभावरी परब यांचे ते काका होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा