You are currently viewing गोवा-मुंबई मार्गावर ८.२२ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; संशयिताला सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

गोवा-मुंबई मार्गावर ८.२२ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; संशयिताला सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

गोवा-मुंबई मार्गावर ८.२२ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; संशयिताला सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

ॲड. अशपाक शेख यांनी केला यशस्वी युक्तिवाद

सिंधुदुर्ग

गोवा-मुंबई मार्गावरील बांदा चेकनाक्यावर पोलिसांनी मारुती सुझुकी ईको गाडीतून (MH- ०७-AS-६४४१) बेकायदेशीररीत्या वाहतूक केला जाणारा तब्बल ८ लाख २२ हजार ३०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला. या प्रकरणी आसिफ कादर मेमन (वय ४८, रा. कोलगाव, सावंतवाडी) याच्यावर भारतीय न्याय संहिता ( BNS) कलम १२३, २२३, २७१, २७५ आणि अन्न सुरक्षा व मानके कलम – ५९ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बांदा पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता, प्रथम पोलीस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
दरम्यान, संशयिताच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली असून, ओरोस येथील मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश – १ श्री. एस. टी. त्रिपाठी यांनी आरोपी आसिफ मेमन याची ५०,००० रुपयांच्या जामिनावर आणि काही अटी-शर्तींसह मुक्तता करण्याचा आदेश दिला. या प्रकरणात बचाव पक्षातर्फे अॅड. अशपाक शेख यांनी मुख्य युक्तिवाद केला, तर त्यांना अॅड. साद शेख, अॅड. नामदेव मठकर, अॅड. पंकज खरवडे व अॅड. विनय रजपूत यांनी सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा