पालकमंत्री नितेश राणेंच्या निर्देशानंतर तात्काळ ८०० इंजेक्शन उपलब्ध
वैभववाडी / प्रतिनिधी :
वैभववाडी तालुक्यातील रुग्णालयात टी.टी. इंजेक्शनची कमतरता होत होती. ही बाब पंचायत समितीचे सभापती सिद्धेश दिलीप रावराणे यांच्या लक्षात येताच त्यांनी पालकमंत्री श्री. नितेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिली. पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार तात्काळ ८०० टी.टी. इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आली असून, ती वैभववाडीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे १५ ऑगस्ट रोजी सुपूर्त करण्यात आली.
यावेळी पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे, तालुका अध्यक्ष सुधीर नकाशे, गटविकास अधिकारी श्री. वाघ, उपसभापती साची कोलते, नासिर काझी, देवानंद पालांडे, मंगेश लोके, सुवर्णा संसारे, साधना नकाशे, स्वप्नील धुरी आदी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
तालुक्यातील रुग्णालयात टी.टी. इंजेक्शनची उपलब्धता सुरळीत व्हावी, यासाठी तातडीने आवश्यक ती कार्यवाही केल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांचे सर्वांनी आभार मानले आहेत. रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली औषधे वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तत्परता दाखविल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
