*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ. अर्चना पंडित लिखित सुरेख पाककृती*
*काजूकरी*
*साहित्य:*
तीन वाट्या काजू
दोन कांदे ,दोन टमाटर ,एक हिरवी मिरची,दहा बारा लसणीच्या कळ्या ,तेल दोन टेबल स्पून ,एक छोटा चमचा तूप, दोन चमचे क्रीम ,बाकी हळद ,तिखट चवी नुसार, धन्याची पूड ,मीठ चवीनुसार एक छोटा चमचा साखर कोथिंबीर
*विधी_*
तेल गरम करून काजू गुलाबी रंगाचे परतून घ्यावे .ते काढून घ्यावे .
कांदे ,मिरची ,लसूण , टमाटर च्या बिया काढून घ्या आणि सर्व मिक्सर मध्ये वाटून घ्या .तेल गरम करून त्यात तूप घालून घ्या .सर्व वाटण त्यात घाला . थोड्या वेळाने हळद ,धन्याची पूड घालून ढवळावे .थोडसं पाणी घालून ढवळावे .तेल सोडू लागले की तिखट घालून घ्या .शेवटी मीठ घाला .मग साखर घाला .साखर घातली की रंग चढतो .नंतर काजू घालून ढवळावे . थोडं पाणी घालून वरून क्रीम घाला .कोथिंबीर बारीक चिरून घालावी .
तयार आहे काजूकरी .नक्की करून बघा .
डॉ अर्चना पंडित, इंदूर 🙏
