वैभव नाईक यांनी कायमच जिल्हा वासियांची काळजी घेतली

वैभव नाईक यांनी कायमच जिल्हा वासियांची काळजी घेतली

आमदार वैभव नाईक यांनी कायमच जिल्हा वासियांची काळजी घेतली म्हणूनच खास कोव्हिड ९९ अ‍ॅम्ब्युलन्स मिळवुन दिली : अतुल बंगे

कुडाळ / पूनम राटुळ :-

कुडाळ मालवण मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार वैभव नाईक हे आमदार म्हणून जनतेत सतत राहीले आणि कायमच मतदार संघात आणि जिल्ह्यातील जनतेची काळजी घेत राहिले त्यापेक्षा आपला आमदार केव्हाही उपलब्ध होणारा आमदार अशी प्रतीमा निर्माण केली. पुरहानी असो किंवा प्रसंग असो देवता सारखा हा उभा रहाणारा माणुस असुन कसलीही मिजाशी नाही असा साधा सुधा स्वभाव आज कोरोनाच्या महामारीत अहोरात्र लोकांच्या मदतीला धावणारा आमदार हे घरात बसुन व्टीट करीत बसले नाहीत तर सगळ्या स्तरातील लोकांना मदतीचा हात दीला त्यामुळे आम्हाला आमच्या नेत्याचा अभिमान आहे असे मत शिवसेनेचे अतुल बंगे यांनी व्यक्त केले.

बंगे म्हणाले पालकमंत्री \उदय सामंत, खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक ही जिल्ह्याला लाभलेली विकासाची त्रिमूर्ती असुन कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर या जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याच्या द्रुष्टीने अतिशय चांगले काम करत असताना आम. नाईक यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या मार्फत आपल्या जिल्ह्यात कोव्हिड 99 अ‍ॅम्ब्युलन्स देऊन जिल्हा वासियांची काळजी घेतली आहे. या साठी तमाम जिल्हा वासिय आमदार वैभव नाईक यांचे आभार मानत आहेत असे बंगे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा