You are currently viewing पावसाची उघडीप मिळताच फोंडाघाटमध्ये रस्त्यांच्या खड्ड्यांची डागडुजी सुरू

पावसाची उघडीप मिळताच फोंडाघाटमध्ये रस्त्यांच्या खड्ड्यांची डागडुजी सुरू

पावसाची उघडीप मिळताच फोंडाघाटमध्ये रस्त्यांच्या खड्ड्यांची डागडुजी सुरू

मारुतीवाडी, हवेलीनगर रस्त्याचे काम सुरू; बाजारपेठेतील खड्डे रात्री बुजविण्याचा निर्णय

फोंडाघाट

पावसाने उघडीप दिल्यानंतर फोंडाघाट येथील मारुतीवाडी आणि हवेलीनगर परिसरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामाला आज सुरुवात करण्यात आली. पावसाची उघडीप कायम राहिल्यास रस्त्याचे काम व्यवस्थित पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही संबंधित ठेकेदाराने दिली.
दरम्यान, फोंडाघाट बाजारपेठेतील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्नही लवकरच मार्गी लावण्यात येणार आहे. बाजारपेठेत दिवसा मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी खड्डे बुजविण्याचे काम रात्रीच्या वेळेत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. खड्ड्यांच्या स्वरूपानुसार मुरूम टाकून अथवा काँक्रिटीकरण करून रस्ता दुरुस्त करण्यात येणार आहे.
मात्र, रात्रीच्या वेळेत काम करताना केवळ दिखाऊ किंवा निकृष्ट दर्जाचे काम होऊ नये, याकडे सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी लक्ष वेधले आहे. “रात्री काम करा; मात्र रात्रीस खेळ चाले अशा पद्धतीने भोगस किंवा निकृष्ट काम केल्यास त्याचा जाब विचारला जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.
रात्रीच्या वेळी काम करण्यासाठी आवश्यक प्रकाशव्यवस्था हवी असल्यास ती उपलब्ध करून देण्यासाठी आपण सहकार्य करू, असेही नाडकर्णी यांनी स्पष्ट केले. “गावात चांगले आणि दर्जेदार काम करा. गावाच्या विकासासाठी सर्वजण आपल्या सोबत राहतील,” असे आवाहन त्यांनी केले.
रस्त्यांची कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण होऊन वाहनचालक व नागरिकांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा फोंडाघाट परिसरातून व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा