You are currently viewing एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमातून जवानांना राख्या रवाना

एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमातून जवानांना राख्या रवाना

‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रमातून जवानांना राख्या रवाना

वेंगुर्ला :

रक्षाबंधनाच्या निमित्ताने देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला यांच्या वतीने ‘एक राखी सैनिकांसाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत सैन्यात कार्यरत असलेल्या सैनिकांसाठी राख्या व प्रेमाचा संदेश पोस्टाद्वारे पाठविण्यात येणार असून, या राख्या वेंगुर्ला पोस्ट ऑफिसच्या पोस्ट मास्टर सौ. वाडकर मॅडम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.

देशाच्या रक्षणासाठी सीमेवर अहोरात्र सेवा बजावणाऱ्या सैनिकांपर्यंत रक्षाबंधनाच्या या पवित्र नात्याची भावना पोहोचावी, तसेच त्यांना समाजाच्या प्रेमाची व आपुलकीची जाणीव व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

यावेळी इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लाच्या अध्यक्षा सौ. ज्योती देसाई, ट्रेझरर सौ. वृंदा गवंडळकर, एडिटर सौ. आरती गिरप, मेंबर सौ. आकांक्षा परब, डॉ. अफशान गौरी तसेच पोस्ट मास्टर सौ. वाडकर मॅडम उपस्थित होत्या.

इनरव्हील क्लबच्या या उपक्रमातून ‘देशसेवा करणाऱ्या जवानांसोबत संपूर्ण समाजाचे प्रेम आणि आशीर्वाद आहेत’ हा भावनिक संदेश देण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा