*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रणिता खंडकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*श्रावण आला..*
अवखळ, अल्लड, पाऊस धारा,
प्रसन्नतेचा करती शिडकावा,
बटा मनोहर जलबिंदूंच्या,
खुळ्या,न आवरती, सावरता!
पदन्यास सृष्टीचा रंगला,
पागोळ्यांनी धरिला ठेका,
लय-तालाच्या समेवरी या,
इंद्रधनुची आगळी शोभा!
व्रतवैकल्ये, सणवारांचा,
श्रावण, सात्विक,दरवळणारा,
ऋतुगंधाने बावरलेला,
वेड लावितो तना-मनाला!
चैतन्याचा फुले पिसारा,
नैराश्याला मुळी न थारा,
आबालवृद्धां, हवाहवासा,
श्रावण आला, श्रावण आला!
©प्रणिता खंडकर.
डोंबिवली, पूर्व.जि ठाणे.
वाॅटसप संपर्क 98334 79845
