शिक्षण प्रसारक मंडळ सचिव विजय वळंजू यांचे प्रतिपादन
कणकवली :
मुलांना देशाचे चांगले नागरिक म्हणून घडविण्याचे काम विद्यामंदिर माध्यमिक शाळेच्या माध्यमातून होत. मुलांच्या व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्यासाठी विद्यामंदिर प्रशालेत विविध उपक्रम राबविले जात आहेत. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना टिकाव लागण्यासाठी त्यांना सर्वकष ज्ञान देण्याचे काम विद्यामंदिर प्रशालेचे शिक्षक करीत आहेत, असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विजय वळंजू यांनी केले.
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत सन २०२५ – २६ वर्षाचा प्रारंभ प्रवेशोत्सव उत्साहात पार पडला. याप्रसंगी श्री. वळंजू बोलत होते. संस्थेचे विश्वस्थ अनिल डेगवेकर, मुख्याध्यापक पी.जे. कांबळे, अच्युत वणवे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. शासनाचे प्रतिनिधी म्हणून नगरपंचायतीचे अमोल भोगले हे उपस्थित होते. पी. जे. कांबळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. अच्युत वणवे नवीा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालक यांना मार्गदर्शन केले.
वळंजू म्हणाले, लहान मूल म्हणजे मातीचा गोळा त्याला आकार देण्यासाठी विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला उत्कृष्ट कार्य करत आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील नामांकित प्रशाला म्हणून गणली गेली आहे. सर्व प्रकारचे शिक्षण उत्तम प्रकारे देणारी प्रशाला आहे. विद्यार्थांचे भविष्य निश्चितच घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अनिल डेगवेकर यांनी शाळेची शिस्त व नियम यांचे पालन विद्यार्थ्यांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले. आरंभी सरस्वती देवीच्या प्रतिमेला पुष्यहार अर्पण मान्यवरांनी केले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे मान्यवरांनी स्वागत केले.