You are currently viewing किसन नगर मधील संस्थेने आदिवासी शाळेत दिली प्रिंटर आणि वॉटर फिल्टरची उपयुक्त भेट

किसन नगर मधील संस्थेने आदिवासी शाळेत दिली प्रिंटर आणि वॉटर फिल्टरची उपयुक्त भेट

ठाणे :

ठाण्यातील संयुक्त कोकण विकास सामाजिक संस्था ठाणे, या रजि. संस्थेच्या सौजन्याने, रायगड जिल्ह्यातील, तळा तालुक्यात जिल्हा परिषद शाळा “आनंदवाडी” व “मेढे आदिवासी शाळा” या शाळांना संयुक्त कोकण विकास यांच्या हस्ते. विद्यार्थ्यांच्या सुविधेकरता प्रिंटर तथा वॉटर फिल्टर देण्यात आले.

संस्थेने विद्यार्थ्यांना दिलेल्या या दोन वस्तूंमुळे मुला, मुलींना व त्यांच्या शिक्षकांना शुद्ध पाणी मिळेल, त्यामुळे त्यांचे आरोग्य उत्तम राहील, त्यातून विद्यार्थ्यांना नियमित शाळेत येता येईल त्याचबरोबर शाळेच्या कामकाजाकरता प्रिंटर दिल्याने शाळेचा प्रिंटिंग खर्च वाचेल. म्हणून संयुक्त कोकण विकास संस्थेने दिलेल्या या दोन वस्तू शाळेसाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहेत. या भेटवस्तूमुळे शाळेतील विद्यार्थी, पालक, शिक्षक, ग्रामस्थ यांनी यावेळी आनंद व्यक्त केला.

या शाळांमध्ये संयुक्त कोकण विकास संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यात दिपक पराडकर, संदेश धुरी, प्रफुल्ल गावडे, धनंजय घाग, नामदेव घाडीगावकर, रुपेश पेडणेकर, प्रमोद परब, समीर मोरे आणि महेश सावंत या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. संयुक्त कोकण विकास ही सामाजिक संस्था किसन नगर, वागळे इस्टेट विभागात कार्यव्रत आहे. किसन नगर मधील काही संवेदनशील नागरिकांनी आपल्या हातूनही समाजाची सेवा घडावी या हेतूने संयुक्त कोकण विकास सामाजिक संस्थेची निर्मिती केली आहे. अशी माहिती पत्रकार रुपेश पवार यांनी दिली आहे.

अॅड रुपेश पवार

9930852165

प्रतिक्रिया व्यक्त करा