You are currently viewing श्री जगन्नाथ संगीत विद्यालय,आयोजित तबला संस्कार कार्यशाळा शिबिर संपन्न….

श्री जगन्नाथ संगीत विद्यालय,आयोजित तबला संस्कार कार्यशाळा शिबिर संपन्न….

कुडाळ

श्री जगन्नाथ संगीत विद्यालय, आयोजित तबला संस्कार कार्यशाळा शिबिर रविवार दिनांक 7 मार्च रोजी कुडाळ, रॉयल प्लाम येथे श्री आबा गावडे यांच्या निवासस्थानी संपन्न झाला. डॉ.श्री दादा परब आणि भजन सम्राट बुवा श्री भालचंद्र केळुसकर संचलित श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाचे तबला प्रशिक्षक श्री धनंजय सावंत याचे विद्यार्थी वर्ग यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यालयाचे पखवाज प्रशिक्षक पखवाज अलंकार श्री महेश सावंत, तसेच श्री विजय सावंत, श्री विलास गोठोस्कर, श्री रूपेश पवार,श्री स्वामी सावंत, श्री तळेकर केंद्रप्रमुख,कु. गौरव पिंगुळकर, कु.साई नाईक,श्री प्रणिल नार्वेकर, श्री मनोज खोचरे,श्री प्रसाद नामनाईक, श्री अनिल धुरी, श्री संजय पिळणकर, श्री संजय गावडे, श्री महेश गावडे,श्री मसुरकर, श्री सुभाष साईल,श्री रोषण कदम, श्री वेंगुर्लेकर,श्री कृष्णा धुरी आदी मान्यवर उपस्थित राहिले. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक संगीताचार्य श्री सचिन कचोटे(कोल्हापूर) यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन करताना रियाज हा मुख्य विषय मांडला व याबरोबर काही कठीण बंदिशी व गणिती सौन्दर्य याबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले.

संगीताचार्य श्री कचोटे सर यांनी अनेक कार्यशाळा मधून, तबला मार्गदर्शन शिबीरे यातून तबला साधकांना नेहमीच प्रेरणादायी आणि आदर्शवादी बहुमोल असे सांगीतिक कार्य हाती घेतलेले आहे.  उ.अमीर हुसेन खां साहेब यांच्यावरील असलेले श्री कचोटे सर यांचे प्रेम आणि त्यांच्या वादन शैलीचा प्रभाव आणि त्यांच्या रचना प्रस्तुत करताना सर अगदी त्यांच्याशी एकरूप होऊन जातात आणि सुंदर असा नजरा रसिक श्रोत्यांना त्यातून मिळतो असे प्रतिभावान कलाकार आपणास व आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक मिळणे म्हणजे खूप मोठे आपल्या विद्यालयाचे भाग्य असे विद्यालयाचे प्रशिक्षक श्री महेश सावंत आणि धनंजय सावंत यांनी  आवर्जून सांगितले. कार्यक्रमासाठी खास पणजी गोवा येथून जेष्ठ पत्रकार आणि संगीत तज्ञ श्री महेश देसाई सर तसेच तबला अलंकार श्री दयानंद मणेरीकर सर हे उपस्थित राहिले होते. लगभग २५ ते ३० विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वीततेसाठी विद्यालयाचे संचालक, प्रशिक्षक,विद्यार्थिवर्ग आणि पालक वर्ग यांच्या सहकार्यातून चांगल्या प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा