You are currently viewing आ. वैभव नाईक व छोटू पारकर यांच्या घरपोच सेवेचा 26 कोरोनामुक्त कुटुंबियांनी घेतला लाभ

आ. वैभव नाईक व छोटू पारकर यांच्या घरपोच सेवेचा 26 कोरोनामुक्त कुटुंबियांनी घेतला लाभ

*कोरोना मुक्तीच्या लढ्यात आ. वैभव नाईक यांचा सेवाभावी उपक्रम ठरतोय लाभदायी*

सिंधुदुर्ग :

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातुन कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांना मोफत घरपोच  सेवेसाठी आमदार वैभव नाईक यांनी आपल्या ताफ्यातील एक बोलेरो गाडी दिली आहे.छोटू पारकर मित्रमंडळ ओरोस यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.गेल्या आठ दिवसात कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यातील 26 कुटुंबियांना त्यांच्या घरी  पोचविण्यात आले आहे. कोरोना मुक्तीच्या लढ्यात आ. वैभव नाईक यांचा सेवाभावी उपक्रम रुग्णांसाठी लाभदायी ठरत आहे. त्याचबरोबर शिवसैनिक अमित भोगले यांनी ही सेवा देताना अत्यंत तळमळीने शिवसैनिकाला साजेसे असे काम केल्याबद्दल त्यांचे आ. वैभव नाईक यांनी कौतुक केले आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना त्याचा ताण प्रशासकीय यंत्रणेवर येत आहे. अशा स्थितीत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना दिलासा देणारा निर्णय कुडाळ मालवण मतदार संघाचे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी घेतला.सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात उपचार घेत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना घरपोच  सेवेसाठी आमदार वैभव नाईक यांनी  आपल्या ताफ्यातील एक बोलेरो गाडी  दिली आहे.

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना अनेकदा  कोरोना पॉझिटिव्ह या नजरेतूनच पाहिले जाते  यामुळे घरी जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था होत नाही, त्यामुळे जिल्हा रुग्णालयातून कोरोनामुक्त रुग्णांना वेळेत घरी पोहोचता यावे व या रुग्णांना कोणताही आर्थिक भुर्दंड सोसावा लागू नये या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने कोरोना विरोधातील या युद्धात कोविड योध्याच्या भूमिकेत आमदार वैभव नाईक यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.या सेवेसाठी जिल्हा रुग्णालयातून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी अमित भोगले- 8411837015 व महेश उर्फ छोटू पारकर – 9422373743 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × five =