You are currently viewing चालत्या वाहनाने अचानक घेतला पेट

चालत्या वाहनाने अचानक घेतला पेट

चालत्या वाहनाने अचानक घेतला पेट; नागरिकांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

बाहेरचा वाडा-कुणकेरी रस्त्यावरील घटना; अग्निशमन दलाने आग पूर्णपणे विझवली

सावंतवाडी

बाहेरचा वाडा-कुणकेरी रस्त्यावर एमएसईबी कर्मचारी साळवी यांच्या चालत्या वाहनाने अचानक पेट घेतल्याची घटना सोमवारी घडली. वाहनाला आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले.
नागरिकांच्या प्रयत्नांमुळे आगीवर प्राथमिक नियंत्रण मिळविण्यात आले. त्यानंतर सावंतवाडी नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आला. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून वाहनाची आग पूर्णपणे विझवली.
या वेळी स्थानिक नागरिक जहूर शेख, शेखर सुभेदार, दिलीप भालेकर, श्री. पटेल तसेच महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर आणि अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. नागरिकांनी प्रसंगावधान राखून केलेल्या तत्पर मदतीमुळे मोठा अनर्थ टळला.

प्रतिक्रिया व्यक्त करा