You are currently viewing सिंधुदुर्गात NABL मान्यताप्राप्त अन्न-पाणी तपासणी प्रयोगशाळेची मागणी

सिंधुदुर्गात NABL मान्यताप्राप्त अन्न-पाणी तपासणी प्रयोगशाळेची मागणी

सिंधुदुर्गात NABL मान्यताप्राप्त अन्न-पाणी तपासणी प्रयोगशाळेची मागणी

पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी व्यापारी महासंघाच्या प्रतिनिधींची देवगड येथे भेट; लवकरच प्रयोगशाळा आणण्याचे आश्वासन

देवगड :

अन्न व पाणी तपासणी अधिक प्रभावीपणे व्हावी तसेच जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित अन्न व शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात NABL मान्यताप्राप्त अन्न व पाणी तपासणी प्रयोगशाळा उभारण्यात यावी, अशी मागणी व्यापारी प्रतिनिधींनी पालकमंत्री तथा बंदर विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. नितेश राणे यांच्याकडे केली.
याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय सावंत व कार्यवाह राजू जठार यांनी देवगड येथे पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी जिल्ह्यात अन्न व पाणी तपासणीसाठी स्वतंत्र व मान्यताप्राप्त प्रयोगशाळेची आवश्यकता त्यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
या मागणीवर सकारात्मक भूमिका घेत लवकरात लवकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात NABL मान्यताप्राप्त तपासणी प्रयोगशाळा आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. तसेच अन्नपदार्थ व पाणी तपासणीसाठी सध्या सुरू असलेले तपासणी कॅम्प पुढेही नियमितपणे सुरू ठेवावेत, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
या भेटीवेळी देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम, महिला तालुकाध्यक्ष प्रियांका साळसकर, माजी आमदार अजित गोगटे, व्ही. सी. खडपकर, दयानंद पाटील, शामराव पाटील, वैभव कळंगुटकर आदी उपस्थित होते.
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची मागणी
जिल्ह्यात अन्नपदार्थ व पिण्याच्या पाण्याची तपासणी स्थानिक पातळीवर अधिक वेगाने आणि प्रभावीपणे होण्यासाठी स्वतंत्र NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळा आवश्यक आहे. या माध्यमातून नागरिकांना सुरक्षित अन्न व शुद्ध पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यास मदत होईल, या उद्देशाने व्यापारी महासंघाने ही मागणी केल्याचे प्रतिनिधींनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा